Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: खेळ रटाळ, पण निकाल समाधानकारक! पंजाबवरील विजयानंतर FC Goaचे प्रशिक्षक मार्केझ असे का म्हणले? वाचा..

Manolo Marquez: एफसी गोवा संघ आता २२ सामने खेळलेल्या बंगळूर एफसी व २१ सामने खेळलेल्या जमशेदपूर एफसीपेक्षा आठ गुणांनी पुढे आहे.

Sameer Panditrao

पणजी: एफसी गोवाने पंजाब एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एका गोलने हरविले. या सामन्यातील खेळ रटाळ होता, पण निकाल समाधानकारक ठरल्याची प्रतिक्रिया विजयी संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सामन्यानंतर दिली.

दिल्ली येथे गुरुवारी रात्री सामन्याच्या पूर्वार्धात कार्ल मॅकह्यू याने नोंदविलेल्या गोलमुळे एफसी गोवाने सलग चौथ्या, तर एकंदरीत तेराव्या विजयाची नोंद केली. त्यांनी आता ४५ गुणांसह द्वितीय स्थान भक्कम केले आहे.

एफसी गोवा संघ आता २२ सामने खेळलेल्या बंगळूर एफसी व २१ सामने खेळलेल्या जमशेदपूर एफसीपेक्षा आठ गुणांनी पुढे आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीअंती एफसी गोवाचे सध्याचे स्थान कायम राहिल्यास अव्वल स्थानावरील मोहन बागानसह ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

सामन्यानंतर मार्केझ म्हणाले, की "खेळ कंटाळवाणा होता. शिल्ड जिंकण्याची संधी आम्ही आधीच गमावल्याने (जोमदार खेळणे) कठीण होते. सामन्यापूर्वी मी खेळाडूंना सांगितले होते, की आमचे द्वितीय स्थान अजून निश्चित नाही.

या लढतीपूर्वी आम्हाला आणखी पाच गुणांची गरज आहे. आता आम्ही खूप जवळ आलो आहोत. आम्हाला अजून एक सामना जिंकायचा असून तो महत्त्वाचा आहे. १-० हा गोलफरक खूपच निसटता असला, तरी मी खेळाडूंच्या प्रयत्नांवर समाधानी आहे आणि मला वाटते की विजय न्याय्य आहे."

गतमोसमातील कामगिरीशी बरोबरी

एफसी गोवाने गतमोसमात (२०२३-२४) आयएसएल स्पर्धेत २२ सामन्यांत १३ विजय, ६ बरोबरी व ३ पराभव यासह ४५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला होता. यंदा साखळी फेरीतील दोन सामने बाकी असताना मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने २२ सामन्यांत १३ विजय, ६ बरोबरी व ३ पराभव यासह ४५ गुण नोंदवून दुसरा क्रमांक मिळविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT