पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात एफसी गोवा संघासाठी कुजिरा-बांबोळी येथील अटल स्टेडियम घरचे मैदान असेल. या संघाचे सामने या स्टेडियमवर फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत खेळले जातील.
एफसी गोवा २०१४ पासून आयएसएल स्पर्धेत खेळत असून कोविड कालावधीतील काही सामन्यांचा अपवाद वगळता त्यांच्यासाठी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम घरचे मैदान होते. सध्या सुरू असलेल्या आयएसएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामनेही फातोर्डा येथेच नियोजित आहेत.
मात्र, आयएसएल स्पर्धा आयोजकांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकानुसार अटल स्टेडियम एफसी गोवाचे घरचे मैदान आहे. अटल स्टेडियमवर एफसी गोवा संघ अनुक्रमे ओडिशा एफसी (४ फेब्रुवारी), नॉर्थईस्ट युनायटेड (७ फेब्रुवारी), चर्चिल ब्रदर्स (२१ फेब्रुवारी), इंटर काशी (९ मार्च), ईस्ट बंगाल (७ एप्रिल), तसेच पंजाब एफसीविरुद्ध खेळेल. चर्चिल ब्रदर्सविरुद्धचा सामना कदाचित फातोर्डा स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.