FC Goa Coach Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोवाच्या कमजोर बचावावर मार्केझ नाराज; म्हणाले की 'आमचे महत्वाचे खेळाडू...'

ISL 2024-25: सामन्याच्या भरपाई वेळेतील गोलमुळे एफसी गोवाने नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पराभव टाळून इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बरोबरीचा एक गुण प्राप्त केला

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25 FC Goa

पणजी: सामन्याच्या भरपाई वेळेतील गोलमुळे एफसी गोवाने नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पराभव टाळून इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. सामन्यानंतर यजमान संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी आपल्या संघाच्या कमजोर बचावावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर शुक्रवारी रात्री एफसी गोवाने नॉर्थईस्ट युनायटेडला ३-३ गोल बरोबरीत रोखून एक गुण प्राप्त केला. बोर्हा हेर्रेरा याने भरपाई वेळेत, तर आर्मांदो सादिकू याने केलेल्या दोन गोलमुळे यजमान संघाला पराभव टाळता आला. नॉर्थईस्ट युनायटेडसाठी नेस्टर अल्बियाच याने दोन, तर अलाएद्दीन अजारेई याने एक गोल केला.

सामन्यात पिछाडीवरून बरोबरी साधल्यामुळे एफसी गोवा संघ सलग तीन सामने अपराजित आहे, पण घरच्या मैदानावर त्यांना अजून विजय नोंदविता आलेला नाही. पहिल्या लढतीत त्यांना फातोर्ड्यात जमशेदपूर एफसीने हरविले होते. एफसी गोवाने चार लढतीतून पाच गुणांची कमाई केली आहे. त्यांचा पुढील सामना फातोर्डा येथेच मुंबई सिटीविरुद्ध १९ ऑक्टोबरला होईल.

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यानंतर मार्केझ यांनी सांगितले की, ‘‘आम्ही बचावात खराब कामगिरी प्रदर्शित केली. आम्ही खूपच वाईट पद्धतीने बचाव करत आहोत. आम्ही अशाप्रकारे गोल स्वीकारू शकत नाही. तरीही परिस्थिती सुधारेल याची मला खात्री आहे. आमच्यापाशी असलेला दर्जा लक्षात घेता आम्ही प्रगती साधू. आमचे महत्त्वाचे खेळाडू तंदुरुस्तीच्या वाटेवर आहेत.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT