FC Goa Record fcgoa.in
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोवाचा 'मोठा पराक्रम '! असा विक्रम करणारा बनला पहिलाच संघ

FC Goa News: २०१४ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवाने पहिल्या गोलची नोंद केली; बोर्हा हेर्रेरा याने साडेतीनशेवा आयएसएल गोल केला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Latest Sports news

पणजी: इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सर्वप्रथम सर्वाधिक साडेतीनशे गोल करण्याचा पराक्रम एफसी गोवा संघाने बजावला. कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत त्यांनी ही किमया साधली.

आयएसएल (ISL 2024-25) स्पर्धेच्या पहिल्या वर्षी २०१४ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवाने पहिल्या गोलची नोंद केली. फ्रान्समधील ग्रेगरी अर्नोलिन याने त्या सामन्यातील ६५व्या मिनिटास एफसी गोवाच्या पहिल्या आयएसएल गोलचा मान मिळविला. २७ सप्टेंबर २०२४ रोजी स्पॅनिश मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा याने एफसी गोवासाठी साडेतीनशेवा आयएसएल गोल केला.

एफसी गोवाचे गोल

मोसम| सामने |गोल

२०१४ | १६ |२१

२०१५ |१७ |३४

२०१६ |१४ | १५

२०१७-१८| २० |४३

२०१८-१९| २१| ४१

२०१९-२०| २०| ५१

२०२०-२१| २२| ३३

२०२१-२२| २०| २९

२०२२-२३| २०| ३६

२०२३-२४| २५|४३

२०२४-२५ |३| ५

एकूण |१९८| ३५१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT