Dr Ramani Goa Marathon Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ramani Marathon 2024: रामाणी मॅरेथॉन होणार तीन नोव्हेंबरला! युवा धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Dr Ramani Goa Marathon 2024

फोंडा: डॉ. पी. एस. रामाणी मॅरेथॉन येत्या तीन नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती या शर्यतीचे प्रणेते प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस डॉ. आंतोनियो फिगरेदो, व्यंकटेश प्रभुदेसाई व प्रेयसी च्यारी यांची उपस्थिती होती.

बांदोडा-फोंडा (Ponda) येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर मॅरेथॉनला पहाटे पाच वाजता सुरवात. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि २१ किलोमीटर अंतर मॅरेथॉनमध्ये धावपटू धावतील. आकर्षक रोख पुरस्कार विजेत्यांना देण्यात येतील. पत्रकार परिषदेत मॅरेथॉनची जर्सी आणि पदकांचे अनावरण करण्यात आले.

ऑनलाईन पद्धतीने मॅरेथॉन सहभाग नोंदणी करता येणार असून त्यासाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. या मॅरेथॉनमध्ये धावपटूंना चांगला अनुभव आलेला असून आरोग्यासाठी धावा हा संदेश देत खुद्द डॉ. पी. एस. रामाणी शर्यतीत सहभागी होत आहेत. ही मोठी जमेची बाजू असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

८६ वर्षीय रामाणी यंदाही धावणार!

जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यंदाही मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. वयाच्या ८६व्या वर्षी ते २१ किलोमीटरचे अंतर धावतील. ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वयाच्या बाबतीत त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण करून विक्रम केलेला आहे. आरोग्यासाठी धावा, देशासाठी धावा असा संदेश देत मॅरेथॉनमुळे आरोग्य संपदा वाढण्यास मदतच होते, असे डॉ. रामाणी यांनी नमूद केले. मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक युवा धावपटूंनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या सदरेवरील पारंपरिक चतुर्थी

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

गोव्यात खाजगी क्षेत्राची उपेक्षाच! प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून देणार? बेरोजगारीची समस्या कशी सोडवणार?

आम्‍हाला शांत गोवा हवाय; संपादकीय

SCROLL FOR NEXT