Colvale Prison Chess Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Intercontinental Chess Tournament: बंदिवानांची बुद्धिबळमध्ये चमक! इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत गोव्यातील कैदी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Colvale Prison Chess Team: कैद्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कारागृह महानिरीक्षकांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडे या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

एरवी कैदी म्हटले की, क्रूर चेहऱ्याची राकट मानवी देहयष्टी डोळ्यांसमोर येते. मात्र, तुरुंगाच्या अभेद्य भिंतींच्या परिघात राहूनही बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळात नैपुण्य दाखविण्याचे कौशल्य कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील पुरुष कैद्यांच्या संघाने दाखविले आहे. या महिन्यात होणाऱ्या चौथ्या एफआयडीई इंटरकॉन्टिनेंटल ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत हा संघ गोवा तुरुंग खाते आणि भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. गोवा तसेच तुरुंग प्रशासनासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे.

२६ व २७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘परिवर्तन-कारागृह ते अभिमान’ या उपक्रमांतर्गत कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता.

कैद्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कारागृह महानिरीक्षकांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडे या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कंपनीने पुरुष संघासाठी शेखर सिरसाट (डेव्हलपमेंटल इन्स्ट्रक्टर) यांची तर कारागृह प्रशासनाने संस्कृती नारोजी यांची महिला संघासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. पुरुष संघासाठी आयुष नाईक, तर महिला संघासाठी संस्कृती नारोजी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त महानिरीक्षक डॉ. स्नेहल गोलतेकर यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला. कारागृह अधीक्षक शंकर गावकर, अतिरिक्त अधीक्षक भानुदास पेडणेकर, उपअधीक्षक अनिल गावकर यांच्या नेतृत्वाखाली कैद्यांच्या या संघाला एक महिना प्रशिक्षण देण्यात आले. तर एफआयडीई इंटरकॉन्टिनेंटल ऑनलाईन बुध्दिबळ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कैद्यांसाठी सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

देशपातळीवर पटकावले दुसरे स्थान

पुरुष कैदी गटात एकूण १० खेळाडू तर महिला गटात पाच खेळाडू सहभागी झाले होते. दोन्ही संघांनी संपूर्ण भारतीय कारागृहांमध्ये दुसरे स्थान पटकावले. मात्र, एफआयडीई इंटरकॉन्टिनेंटल ऑनलाईन बुध्दिबळ स्पर्धेसाठी फक्त पुरुष संघ पात्र ठरला आहे. पुरुष गटात १३ तर महिला गटात पाच संघांनी सहभाग घेतला होता.

मानसिक, शारीरिक सुधारणा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) परिवर्तन - कारागृह ते अभिमान (परिवर्तन- जेल टू प्राईड) उपक्रमांतर्गत भारतातील तुरुंगातील कैद्यांसाठी बुध्दिबळ आणि इतर क्रीडाविषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. कैद्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणे आणि त्यांचे जीवन बदलणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT