Professional Football League | Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional Football League: चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेत सलग दुसरा पराभव! साळगावकरच्या मेव्हझेनचा गोल निर्णायक

Professional League Tournament: क्लब द (सीडी) साळगावकर संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी यंदा स्पर्धेत पदार्पण केले असून माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सवर रविवारी १-० फरकाने निसटती मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास मेव्हझेन ऑलिव्हेरा याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर क्लब द (सीडी) साळगावकर संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी यंदा स्पर्धेत पदार्पण केले असून माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सवर रविवारी १-० फरकाने निसटती मात केली.

माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने नमविले होते. स्पर्धेतील पहिल्या लढतीत जीनो एफसीविरुद्ध बरोबरीचा एक गुण प्राप्त केलेल्या साळगावकरचे आता दोन लढतीतून चार गुण झाले आहेत. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात सीडी साळगावकरचा कर्णधार प्रतेश शिरोडकर याला रेफरीप्रती असभ्यता प्रदर्शित केल्याबद्दल थेट रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे त्यांचा एक खेळाडू कमी झाला. त्याला लाभ उठविण्याचे जोरदार प्रयत्चर्चिल ब्रदर्सने केले, पण साळगावकर संघाने आघाडी निसटू दिली नाही.

सामना सुरू झाल्यानंतर लगेच सीडी साळगावकरने आक्रमणावर लक्ष केंद्रित केली. सामन्याच्या ४०व्या सेकंदास त्यांना संधी होती, पण साधली गेली नाही. मात्र लगेच डेनिल रिबेलोने तोलूनमापून दिलेल्या क्रॉसपासवर मेझव्हेन याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक नीतिश मेहरा याने जागा सोडल्याचे अचूक हेरून चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. नंतर साळगावकरच्या बोईनाओ सिंग याला संधीचा लाभ घेता आला. शिवाय चर्चिल ब्रदर्सचा बचावपटू अथर्व दांडेकर याची दक्षताही प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT