Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार!

Arjun Tendulkar IPL Auction 2025: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला IPL 2025 च्या मेगा लिलावात मोठा झटका बसला होता.

Manish Jadhav

Arjun Tendulkar IPL Auction 2025: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला IPL 2025 च्या मेगा लिलावात मोठा झटका बसला होता. जेव्हा त्याचे नाव पहिल्यांदा समोर आले, तेव्हा त्याला कोणत्याही टीमने घेतले नव्हते. पण दुसऱ्यांदा त्याचे नाव आल्यावर मुंबई इंडियन्सने त्याला संघाचा भाग बनवले. मुंबईने अर्जुनला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी करत आपल्या संघाचा भाग बनवले.

रोहितच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले

टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या अर्जुनला आयपीएलमध्ये 5 सामने खेळायला मिळाले, ज्यात त्याने केवळ 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले होते. 30 लाखांच्या मूळ किमतीसह मेगा लिलावात सहभागी झालेल्या अर्जुनमध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या अर्जुनच्या नावावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोहोर उमटवली.

मेगा लिलावापूर्वी चूक

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व खेळाडू फ्रँचायझींचे लक्ष वेधण्यात व्यस्त होते. अनेक खेळाडूंनी संघांचे लक्ष वेधून घेतले आणि ते करोडपती झाले. पण मेगा लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) कामगिरी काही खास नव्हती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनला सुवर्णसंधी होती, पण विशेष कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. अपेक्षेच्या विरुद्ध अर्जुनने या स्पर्धेत महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या. या काळात त्याच्या गोलंदाजीतून काही खास दिसले असते तर संघ त्याच्यावर बोली लावू शकले असते.

13 वर्षीय खेळाडूची किस्मत चमकली!

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीची किस्मत झाली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैभव करोडपती झाला. सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी वैभव अजूनही दावेदार आहे. राजस्थान रॉयल्सने वैभवला 1.1 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. अलीकडेच, वैभवने अंडर-19 ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध विक्रमी शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला आयपीएल लिलावात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT