Arjun Tendulkar Ranji Trophy  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: रणजी सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा भेदक मारा; ५ गडी बाद करत अरुणाचल प्रदेशचा निम्मा संघ केला गारद

Arjun Tendulkar Performance in Ranji Cricket: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील प्लेट विभागात गोव्यातर्फे खेळताना या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अरुणाचल प्रदेशचे पाच गडी बाद केले.

Akshata Chhatre

पणजी, ता. १३ (क्रीडा प्रतिनिधी): मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने बुधवार (दि. १३ नोव्हेंबर) रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वैयक्तिक स्थरावर सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील प्लेट विभागात गोव्यातर्फे खेळताना या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अरुणाचल प्रदेशचे पाच गडी बाद केले.

गोव्यात पर्वरी येथे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चार दिवसीय सामन्याला बुधवारपासून सुरवात झाली आणि गोव्याने पहिल्याच दिवशी टी-ब्रेक पूर्वी अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव ५ बाद ३६ वरून फक्त ८४ धावांवर गुंडाळला.

अर्जुनच्या पाच विकेट व्यतिरिक्त गोव्यातर्फे ऑफस्पिनर मोहित रेडकर याने तीन, तर नवीन पदार्पण करणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने दोन गडी बाद केले.

२५ वर्षीय अर्जुनने भन्नाट स्पेल टाकत सकाळच्या सत्रात ९-३-२५-५ अशी प्रभावी गोलंदाजी केली. गोव्यातर्फे पाहुणा क्रिकेटपटू म्हणून अर्जुन तेंडुलकर सध्या सलग तिसरा मोसम खेळत आहे आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील १७व्या रणजी क्रिकेट सामन्यात त्याने वैयक्तिक स्थरावर आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT