All Goa Chess Tournament-Selection Test Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

All Goa Chess Tournament: इव्हान, सिदोनिया यांना अपराजित कामगिरीसह बुद्धिबळात विजेतेपद

All Goa Chess Tournament Selection Test: दोन्ही गटातील पहिले दोन खेळाडू बंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सात वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करतील

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इव्हान तेलिस आणि सिदोनिया दा कुन्हा यांनी अपराजित कामगिरीसह सात वर्षांखालील अखिल गोवा बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत अनुक्रमे खुल्या व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.

इव्हानने अव्वल कामगिरी बजावताना खुल्या गटात सर्व सहाही डाव जिंकले. प्रयांक गावकर व आरव नाईक यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. जोश कार्दोझने चार गुणांसह चौथा क्रमांक मिळविला. अंश गावस, आरव नागेशकर यांना अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान मिळाले.

मुलींच्या गटात सिदोनिया हिने सर्व पाचही डावांत विजय मिळविला. आराध्या देसाई व शिवान्या राव यांचे प्रत्येकी चार गुण झाले. त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला. तृषा पटेकर हिला चौथा, राघवी हळदणकरला पाचवा, तर श्रीशा घाडी हिला सहावा क्रमांक मिळाला.

सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा बड्डे-मडगाव सरकारी महाविद्यालयात झाली. स्पर्धेच्या खुल्या गटात २९, तर मुलींत १७ खेळाडूंनी भाग घेतला. दोन्ही गटातील पहिले दोन खेळाडू बंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सात वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करतील.

बक्षीस वितरण सोहळा बड्डे-मडगाव सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एफ. एम. नदाफ, तसेच प्रदीप गावकर, आशेष केणी, दामोदर जांबावलीकर, सत्यवान हरमलकर, दिलीप वेर्णेकर यांच्या उपस्थितीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT