32nd National Junior Tennis Ball Cricket Tournament Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Tennis Ball Cricket Tournament: ज्युनिअर टेनिस बॉल स्पर्धेत गोवा उपविजेता! उत्तर प्रदेशकडून पराभव; महिला संघ तिसऱ्या स्थानी

Junior Tennis Ball Cricket Tournament: हरियानातील सोनिपत येथे झालेल्या ३२व्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलांना उपविजेतेपद मिळाले. अंतिम लढतीत उत्तर प्रदेशने त्यांच्यावर मात केली. मुलींच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला.

गोमन्तक डिजिटल टीम

32nd National Junior Tennis Ball Cricket Tournament

पणजी: हरियानातील सोनिपत येथे झालेल्या ३२व्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलांना उपविजेतेपद मिळाले. अंतिम लढतीत उत्तर प्रदेशने त्यांच्यावर मात केली. मुलींच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला.

गोव्याच्या मुलांनी उपांत्य लढतीत महाराष्ट्राला नमविले. अंतिम लढतीत उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित आठ षटकांत सात बाद ६८ धावा केल्या. तुषार नाईकने दोन, तर अक्षद नाईक व साहिल पारोडकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल गोव्याचा डाव ७.१ षटकांत ६२ धावांत संपुष्टात आला. ग्रंधार महातो याने १६, साहिल पारोडकरने १२, तुषार नाईकने १०, तर अक्षद नाईकने ११ धावा केल्या.

गोव्याच्या मुलींना उपांत्य सामन्यात त्यांना जम्मू-काश्मीरकडून ११ धावांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. जम्मू-काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना ५.४ षटकांत ४७ धावा केल्या. गोव्यातर्फे पूर्वा गावडे व प्रतीक्षा केरकर यांनी प्रत्येकी एक, तर संचिता शेटगावकर व तनिशा वेळीप यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. निर्धारित सहा षटकात गोव्याला ७ बाद ३६ धावाच करता आल्या. तनिशा वेळीपने सर्वाधिक १० धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT