Liza Pinheiro  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Liza Pinheiro Success Story: ‘कृषी’ क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणारी गोमंतकीय कन्या, 26 वर्षीय लिझा पिन्हेरोचे प्रेरणादायी यश

Women's Day 2025: भारत हा शेती प्रधान देश आहे हे सर्वश्रुत असले तरी या क्षेत्रात पूर्वी पुरुषांचा जास्त बोलबाला असायचा व महिलांचा केवळ मदत करण्यापुरता सहभाग असायचा; पण आता कृषी क्षेत्रामध्ये अनेक दालने खुली झाली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Women's Day 2025 Liza Pinheiro Women Entrepreneur Agriculture Goa

मंगेश बोरकर

सासष्टी: भारत हा शेती प्रधान देश आहे हे सर्वश्रुत असले तरी या क्षेत्रात पूर्वी पुरुषांचा जास्त बोलबाला असायचा व महिलांचा केवळ मदत करण्यापुरता सहभाग असायचा; पण आता कृषी क्षेत्रामध्ये अनेक दालने खुली झाली आहेत. केवळ शेती, भाज्या, फळे व कडधान्य पिकवण्यापुरते हे क्षेत्र मर्यादित राहिले नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेण्यासाठी आता महिलाही तत्परता दाखवत आहेत. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वास्को येथील कृषी क्षेत्रातील उद्योजिका, मार्गदर्शक लिझा पिन्हेरो.

२६ वर्षीय लिझाने २०२० साली डॉन बॉस्को कृषी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली व लगेच तिने कृषी सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. तिने ‘फ्रूट्स हार्ड वर्क’ ही कंपनी सुरू केली. गेली चार वर्षे तिचा व्यवसाय सुरू आहे व दरवर्षी लोकांचा वाढता प्रतिसाद मिळतो, असे ती सांगते.

या कंपनीद्वारे ती वेगवेगळ्या वनस्पतीची रोपटी, खत, सेंद्रिय किटकनाशक वगैरेचा पुरवठा करीत आहे. त्याचबरोबर लॅंड स्केपिंग, बागेची देखभाल, घरात बाग तयार करणे, नारळांच्या झाडांना खत घालणे, वनस्पती, रोपटी, झाडांच्या आरोग्य संदर्भात सल्ला देणे यासारखी सेवा पुरवीत असते. आपल्याला शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्थांमार्फत मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते, अशी माहिती लिझाने दिली.

महिला सक्षमीकरणासाठी उत्तम क्षेत्र

कृषी (Agriculture) क्षेत्रात काम करताना कठोर परिश्रमाची गरज असते. त्याचबरोबर हा एक चांगला उत्पन्न स्रोत आहे. पूर्वीप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करणे कोणीही कमी दर्जाचे मानत नाही. देशातही कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त झाले असून या क्षेत्रात काम करणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. जास्तीत जास्त महिलांनी कृषी क्षेत्रात आपले नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे हे उत्तम क्षेत्र आहे, असे लिझा पिन्हेरो हिचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT