Goa Water Crisis Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

Goa water scarcity crisis: यंदा गोव्यात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

यंदा गोव्यात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. नद्या, नाले आणि ओहळांमध्ये सध्या उपलब्ध असलेले पाणी वाहून जाण्यापूर्वी ते अडविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना हाती घ्यायला हव्यात.

पूर्वी शेती-बागायतीसाठी ओहळांवर पालापाचोळा आणि माती वापरून छोटे बांध घातले जात. त्यामुळे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग केला जात असे. अशाच प्रकारची व्यवस्था यंदा तातडीने गावोगावी आणि जंगल परिसरात उभारण्याची गरज आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेले पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत कसाबसा पुरेलही; मात्र उन्हाळ्यात जंगली प्राण्यांनाही पाणीटंचाईचे चटके बसू शकतात. पाण्याच्या (Water) शोधात गवे आणि हत्ती गावांमध्ये येऊन हैदोस घालतात.

यंदा पाणीटंचाई तीव्र झाल्यास अन्य वन्यप्राण्यांचाही मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित खात्याने लालफितीत न अडकता तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात. अजूनही अधूनमधून पाऊस पडत आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता असली, तरी भविष्यातील पाणीटंचाईचा धोका ओळखून आतापासूनच पाणीसाठा करण्यावर भर द्यायला हवा. उन्हाळ्यात धरणांमधील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याचे कामही हाती घ्यावे. शेवटी, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. आज पाणी वाचवले, तरच उद्याचे संकट टाळता येईल. जल है तो कल है! - सर्वेश्वर भैरेली, पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Assembly Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप, राममंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे मुद्दे झाले जुने; योगी आदित्यनाथ यांची अग्निपरिक्षा

राजकीय आरक्षणाच्या हक्कासाठी आदिवासी समाज रणांगणात उतरणार; आगामी विधानसभा निवडणुकीत 23 मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा ‘उटा’चा निर्णय

खून, घरफोड्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळे काणकोणवासीयांमध्ये रोष, मूक आंदोलनातून सरकारचं वेधलं लक्ष; कठोर कारवाईची केली मागणी

Goa Political Alliance: विरोधकांचे आघाडीचे पाऊल; जागावाटप पुन्‍हा लांबणीवर! फॉरवर्ड, आरजीसोबतच्‍या बैठकीला गिरीश, युरींची दांडी

खरी कुजबुज: राजकारण्यांचे भक्त...

SCROLL FOR NEXT