Goa Fishing  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Fishing: गोव्याची वाटचाल मत्स्य दुष्काळाकडे?

Goa fisheries: मत्स्योत्पादन गोव्याच्या अर्थकारणाच्या साखळीतील अत्यंत दुबळा दुवा आहे. गोव्याचे मत्स्योत्पादन कमी होत चालले आहे आणि भविष्यकाळातील मत्स्यदुष्काळाकडे आपली वाटचाल चालू आहे.

Sameer Panditrao

दत्ता दामोदर नायक

मत्स्योत्पादन गोव्याच्या अर्थकारणाच्या साखळीतील अत्यंत दुबळा दुवा आहे. गोव्याचे मत्स्योत्पादन कमी होत चालले आहे आणि भविष्यकाळातील मत्स्यदुष्काळाकडे आपली वाटचाल चालू आहे.

२०१७-१८ वर्षात गोव्यात १,२४,००० टन मत्स्योत्पादन झाले. २०२१- २५ साली ते १,१६,००० टनांवर उतरले. गोव्याला १०५ किलोमीटर परिसरात समुद्रकिनारा लाभला आहे. त्याशिवाय गोव्यात मुबलक पाण्याने वर्षभर वाहणाऱ्या नद्या आहेत.

निवळशंख - पाण्याचे तलाव व आरस्पानी पाण्याच्या तळ्या आहेत. त्यामुळे ‘मत्स्य वाढवावे युक्ती’ असे नवे सुभाषित घडवून गोव्यातील मत्स्योत्पादन प्रयत्नपूर्वक वाढवले पाहिजे. ‘शेवटा’ हा गोव्याचा राज्य मासा आहे. वास्तविक हा मान बांगड्याला मिळायला हवा होता. बहुसंख्य गोमंतकीयांना रोजच्या जीवनात मासे लागतात. माशांच्या किमती महाग होत चालल्या आहेत आणि प्रोटीन देणारे मासे खरेदी करणे सामान्य गोमंतकीयांच्या अवाक्याबाहेरचे झाले आहे.

भाज्यांचे किरकोळ गाडे आहेत त्याप्रमाणे कापून स्वच्छ केलेल्या ताज्या माशांचे गाडे गोव्याच्या सर्व शहरांत व गावांत असावेत. गोव्यातील पंचतारांकित हॉटेलात गोव्यातील मासे मिळत नाहीत. पण आयात केलेला रुचीहीन बासासारखा मासा मिळतो. ही पद्धत बंद झाली पाहिजे.

गोव्यात दरवर्षी सीफूड फेस्टीवल भरवण्यात यावा.

गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्वेरियम असायला हवा. असे अ‍ॅक्वेरियम दुबय, अबुधाबी, फ्लोरीडा, अटलांटा, ऑकलंड, वेनेशिया, लिस्बन, मॉस्को ह्या शहरांत आहेत. माशांचा अ‍ॅक्वेरियम हे पर्यटकांचे फार मोठे आकर्षण होईल. हॉलंडमध्ये फिशिंग व्हिलेजस आहेत. त्या धर्तीवर गोव्यातील नदीकाठच्या गावांत डेक्स उभारून फिशिंगचे संसाधन बळ उभारावे.

गोपाळकृष्ण भोब्यांचे ‘मासे व मी’ ह्या मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद गोव्याच्या पर्यटन खात्याने करावा अशी सूचना डॉ. नंदकुमार कामत यांनी केली आहे. ही सूचना अत्यंत स्वागतार्ह असून ती त्वरित अमलात यावी. गोव्यातील माशांच्या विविध खाद्यपदार्थांच्या पाकक्रियेवरील कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तके गोव्यात उपलब्ध व्हावीत.

मत्स्योत्पादन हे आपल्या आर्थिक नियोजनाच्या ‘सेंटर स्टेज’वर यावे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT