Goa Politics Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: भाजप-मगो युती, कितने दूर कितने पास?

Goa BJP Mgp Alliance: मगो पक्ष सध्या भाजप सरकारात आहे. अशी ग्वाही मगोचे प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी नुकतीच दिली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

मगो पक्ष सध्या भाजप सरकारात आहे. आणि आगामी निवडणुकीतही ही युती राहणार अशी ग्वाही मगोचे प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी नुकतीच दिली आहे. पण सध्या ज्या घडामोडी घडत आहे ते पाहता ही युती होईल की नाही यावर अधिकारवाणीने सांगता येणे कठीण झाले आहे.

यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघाचा. हा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत मगोचा पराभव करून भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला होता. त्यामुळे भाजपचा दावा प्रियोळवर असणे साहजिकच आहे. आणि तशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिलीही आहे. पण मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा वेगळा विचार दिसतो आहे.

त्यांनी हा मतदारसंघ एसटीकरता आरक्षित झाला तरीही मगोचा प्रियोळवर दावा असणार असे सांगून युतीबाबतचा संशय अधोरेखित करून टाकला आहे. आता भाजप मगोची ही मागणी मान्य करतो की नाही यावर युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. याला दुसरा कोन आहे तो फोंड्याचा. फोंडा येथे मगो आपले कार्यालय उघडणार असे पक्षाने जाहीर केले आहे. तसेच मगो फोंड्यावरही दावा ठोकणार असेही बोलले जात आहे.

दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांनी मगो सोडल्यापासून फोंड्यात मगोचे अस्तित्व तसे नावापुरतेच होते. त्यावेळी फोंड्यात कार्यालय उघडण्याचा विचार मगोने का केला नाही, असा प्रश्न यामुळेच अनेकांना पडू लागलाय. पण आता फोंड्यात कार्यालय सुरू करणे म्हणजे भाजपपुढे आव्हान उभे करणे असे बोलले जात आहे. इथेही गेल्या निवडणुकीत मगोचा पराभव करून भाजप विजयी झाला होता. तीच गोष्ट शिरोड्याची. मगोने सुभाष शिरोडकरांच्या शिरोड्यावर लक्ष ठेवणे म्हणजे ’आ बैल मुझे मार’ यातलाच प्रकार.

या सर्वामागचे मुख्य कारण म्हणजे मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर. त्यांचे लक्ष आहे ते प्रियोळवर. प्रियोळ आरक्षित झाला तर शिरोडा वा फोंड्यावर. अन् इथेच तर खरी गोम आहे. गेल्या निवडणुकीत हे तिन्ही मतदारसंघ भाजपने जिंकले होते अन् फोंड्यात सध्या आमदार नसला तरी तिथे भाजपची चांगली बांधणी आहे.

यामुळे भाजप यांपैकी कोणत्या मतदारसंघावर मगोकरता पाणी सोडतो यावर युतीचे समीकरण निश्चित होणार आहे. निवडणुकीपूर्वी युती तोडून निवडणुकीनंतर युतीत शिरण्याचा डाव मगो पुन्हा खेळू शकतो, असाही अंदाज व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने मगो तयारी करत असल्याचेही दिसून येत आहे. हे सर्व पाहता तूर्त भाजप-मगो युती कितने पास वा कितने दूर है हे सांगणे ’मुश्किल ही नही, नामुमकीन है’ हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT