Stone basin in Hampi Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

पोर्तुगीज प्रवासी फर्नाव विजयनगरच्या हत्तींचे वर्णन करतो; दक्षिणेतील सर्वांत शक्तिशाली साम्राज्य, हंपीमधील दगडी हौद

Portuguese role in Indian animal trade: प्राचीन भारतातील सैन्यात हत्ती अत्यंत महत्त्वाचे होते. पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पारंपरिक सैन्यात चार मुख्य विभाग असत.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

प्राचीन भारतातील सैन्यात हत्ती अत्यंत महत्त्वाचे होते. पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पारंपरिक सैन्यात चार मुख्य विभाग असतं : हत्ती, घोडदळ, घोडेस्वार रथ आणि पायदळ. हत्तीचा वापर राजा आणि सेनापती दोघांनाही युद्धात वाहून नेण्यासाठी केला जात असे.

मध्ययुगीन भारतात हत्तींचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. हत्तींच्या व्यापारात कलिंग (सध्याचा ओरिसा), पेगू (सध्याचा म्यानमारचा भाग) आणि सिलोन (सध्याचा श्रीलंका) हे तीन प्रमुख निर्यातदार होते आणि त्यांचे ग्राहक विजयनगर, विजापूर, गोलकोंडा, तंजावर, मदुराई आणि बंगाल. सिलोनमधील हत्ती युद्धात सर्वोत्तम हत्ती मानले जात आणि सिलोन हस्तिदंत उच्च दर्जाचे मिळे. विसाव्या शतकात ब्रिटिश भारतीय सैन्याने हत्तींचा वापर मालवाहतुकीसाठी केला.

भारत हा सिलोन हत्तींसाठी एक मोठी बाजारपेठ होती. सिंहली लोकांकडून पोर्तुगिजांनी हा व्यापार हस्तगत केला आणि त्यांच्या उत्कृष्ट जहाजबांधणी कौशल्याचा वापर करून त्यावर मक्तेदारी मिळवली.

त्यांच्यानंतर डच लोकांनी सिलोनमधील व्यापार हाती घेतला. युद्धात घोड्यांचे महत्त्व आणि नियमित पुरवठा राखण्याची अडचण आणि महत्त्व पाहता त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर हत्तींच्या समांतर व्यापाराबद्दल फारशी माहिती नाही. हत्ती हे भारतातील मूळचे असल्याने आणि मोठ्या संख्येने पकडले गेले असल्याने त्यांच्या व्यापाराचा इतिहास व माहिती मिळत नाही.

विजयनगरातील प्रथम अरब व्यापाऱ्यांनी आणि नंतर पोर्तुगिजांनी घोड्यांच्या व्यापारावर मक्तेदारी मिळवली, विशेषतः विजयनगरच्या राजांकडून नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवासादरम्यान झालेल्या कोणत्याही प्राण्यांच्या मृत्यूसाठी पैसे मोजले जात असत, अशी माहिती सापडते.

असेही मानले जाते की, विजयनगरातील हंपीमध्ये संपूर्ण विजयाविठ्ठल हा बाजार घोड्यांच्या व्यापारासाठी समर्पित होता. विजयनगरातील मंदिरावरील कोरीवकामांवर एक नजर टाकली तर विजयनगरच्या लोकांना हत्तींचे महत्त्व, ज्ञान होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भावनिक नाते होते हे लक्षात येते. हंपी येथील हत्तींचे तबेले विजयनगर राजांनी हत्तीशी किती महत्त्व ठेवले होते याची साक्ष देतात. शाही हत्तींना राहण्यासाठी बांधलेले हे एक विस्तृत आयताकृती बांधकाम ज्यामध्ये अकरा खोल्यांची एक रांग आहे व प्रत्येकी दोन हत्तींना राहण्यासाठी बांधले गेले होते. हे हंपीमध्ये अजूनही उभ्या असलेल्या वास्तुकलेचे उत्तम उदाहरण.

पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस कृष्णदेवरायांच्या दरबारात भेटीवेळी सुरू असलेल्या महानवमी उत्सवाचे तपशीलवार वर्णन करतो, ज्यामध्ये हत्तींबद्दलचा हा उतारा समाविष्ट आहे - ‘ मखमली आणि सोन्याच्या कपड्यांनी मढवलेल्या युद्ध हत्तींची एक तुकडी, ज्यांच्यावर अनेक रंगांची झालर आणि भारदस्त कपडे आणि घंटा आहेत जेणेकरून पृथ्वी गुंजेल आणि त्यांच्या डोक्यावर राक्षस आणि इतर प्रकारच्या महान प्राण्यांचे चेहरे रंगवलेले आहेत. प्रत्येकाच्या मागे तीन किंवा चार पुरुष आहेत, त्यांनी विणकाम केलेले अंगरखे घातलेले आहेत आणि ढाल आणि भाला घेतलेले आहेत’.

१५०१मध्ये भेट देणारे पोर्तुगीज प्रवासी डुआर्टे बार्बोसा म्हणतात की, ‘राजाकडे नऊशेहून अधिक भव्य आणि सुंदर हत्ती होते जे युद्ध आणि राज्य दोन्हीसाठी वापरले जात होते’. १६व्या शतकातील पोर्तुगीज प्रवासी फर्नाव नुनिज विजयनगरच्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या हत्तींचे वर्णन करतो. १४व्या ते १६व्या शतकात दक्षिणेतील सर्वांत शक्तिशाली साम्राज्य म्हणून, विजयनगरकडे हत्तींना पकडण्याची सक्षम व्यवस्था होती.

हंपीमध्ये आढळणाऱ्या विस्तीर्ण अवशेषांमध्ये व असंख्य हत्तींच्या कोरीवकामांमध्ये हत्तींच्या व्यापाराचे पुरावे स्पष्टपणे आढळतात. हत्तीच्या विविध कोरीव शिल्पांमध्ये हत्ती पालनाच्या व दैनंदिन दृश्यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर वाघांची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींची कोरीव शिल्पे आहेत. हत्तींचा वापर शिकारीसाठी स्वार म्हणून नव्हे तर शिकार मारण्यासाठी केला जात असे. हत्तींच्या लढाया हा आणखी एक शाही मनोरंजनाचा खेळ होता; ज्याचे चित्रण हंपीच्या भिंतींवर दगडात कोरलेले आढळते. हजारा राम मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कूच करणाऱ्या हत्तींच्या तुकडीसह महानवमी उत्सव कोरलेला आहे.

विजयनगरातील हंपीमध्ये सभागृहाच्या वायव्येस मोठा दगडी कुंड आणि हत्तीचा टाक आहे. हा कुंड १२ मीटर लांबीचा आणि २००० लीटरपेक्षा जास्त पाण्याचा साठा असलेला आहे. कदाचित त्या भागात काम करणाऱ्या किंवा राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्राण्यांसाठी पाणी साठवले जात असावे. कुंडाच्या एका बाजूला एक लहान छिद्र आहे, जे पाणी साठवताना बंद ठेवले जाते असे.

या छिद्रामुळे कुंड स्वच्छ करण्यापूर्वी किंवा पुन्हा भरण्यापूर्वी पाणी काढून टाकता येत असे. अनेबावी म्हणून ओळखली जाणारी विहीरया कुंडाच्या नैऋत्येस स्थित आहे. ही विहीर चौकोनी आहे आणि दक्षिणेला अरुंद पायऱ्या आहेत. त्याच्या पश्चिमेला असलेल्या हत्तीच्या शिल्पामुळे तिला अनेबावी (हत्तीची विहीर) असे नाव मिळाले असावे. हत्तींना पाणी पिण्यासाठी हे सोयीचे असावे बहुधा. एका बाजूला एका हत्तीची छोटीशी मूर्ती आहे ज्यातून पाणी वाहते.

पाणीपुरवठ्यासाठी हंपीमध्ये भूमिगत कालव्यांचे एक मोठे जाळे पाहायला मिळते. या कालव्यांमधून मोठ्या संख्येने मंदिरे, पुष्करणी (पायऱ्या असलेली पाण्याची टाकी), राणीच्या स्नानगृहासारखी स्नानगृहे आणि गरम दिवसात थंडावा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलमंडपांना पाणीपुरवठा केला जात असावा. या कालव्यांना पाणी थोड्या उंचावर असलेल्या कमलापूर तलावातून पुरवले जात असे. विजयनगरातील शाही आवारात घोड्यांना पाणी पिण्यासाठी एक दगडी १२ मीटर लांबीचा हौद आहे जो पाणी साठवण्यासाठी वापरतात होता. ज्यातून ८ ते १० घोडे एकाच वेळी पाणी पीत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणातील प्राध्यापकाचा 'दुसऱ्यांदा' जीवन संपवण्याचा प्रयत्न

Goa Crime: भिंतीवरून मारल्या उड्या, पंचांवर हेल्मेटने हल्ला; दुर्गा-चिंचोणे येथे दिवसाढवळ्या भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न

Rashi Bhavishya 18 July 2025: एखादं स्वप्न साकार होऊ शकतं, नव्या करारापूर्वी नीट विचार करा; निर्णय घ्यायला उत्तम दिवस

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT