Sur Jahan World Music Peace Festival Goa 2025 
मनरिजवण

Sur Jahan World Music Peace Festival: कोरोनानंतर 5 वर्षांनी कमबॅक; पणजीत होणार संगीत महोत्सव; पाहा Timetable

Sur Jahan World Music Peace Festival Goa 2025: भारतीय कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कलाकार देखील या महोत्सवात कला सादर करतील.

Pramod Yadav

Sur Jahan World Music Peace Festival Goa 2025

पणजी: गोव्यात तब्बल पाच वर्षानंतर सूर जहान वर्ल्ड म्युझीक पीस फेस्टिव्हल होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात हा महोत्सव बंद करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा हा महोत्सव कमबॅक करत आहे. पणजीतील कला अकादमीत हा संगीत महोत्सव होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला अकादमी, पणजी येथे ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी हा संगीत महोत्सव होईल. यावर्षीच्या महोत्सवासाठी शांततेसाठी संगीत, सर्वांसाठी संगीत, अशी थीम ठेवण्यात आली आहे. भारतीय कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कलाकार देखील या महोत्सवात कला सादर करतील.

२०११ मध्ये या महोत्सवाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला या महोत्सवाचे सुफी सूत्र असे नाव होते. सर्वांसाठी खुला असणारा या महोत्सवाने अल्पावधीत प्रसिद्धी मिळवली आणि हळूहळू यासाठी उपस्थिती लावणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

कोण कोण करणार सादरीकरण

डच संगीताचा आनंद देण्यासाठी फलकॉर्न सादरीकरण करतील, स्वीडिश संगीतकार आणि वाद्य वादक ऐल मोलर देखील या महोत्सावला हजेरी लावणार आहे. याशिवाय उंब्रा आणि विविध भारतीय संगीताचा आस्वाद घेता येणार आहे. यात बंगाल, राजस्थानसह आदीवासी संगीत देखील ऐकायला मिळणार आहे.

यापूर्वी कोठे कोठे झाला महोत्सव

पणजी (२०१५-२०२०), नवी दिल्ली (२०१२, २०१३, २०१५ आणि २०१९), जयपूर (२०२०), पटणा (२०१४) आणि ढाका (२०१४)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT