Keerthy Suresh Wedding Card Social Media X
मनरिजवण

Keerthy Suresh Wedding Card: फक्त सहा दिवस उरले! गोव्यात जय्यत तयारी सुरु, कीर्ती-अँटोनीची लग्नपत्रिका व्हायरल

Keerthy Suresh Antony Thattil Goa Wedding: कीर्ती आणि अँटोनीच्या व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेत दोघांच्या नावांशिवाय अभिनेत्रीच्या पालकांची नावेही लिहिली आहेत.

Pramod Yadav

Keerthy Suresh Antony Thattil Goa Wedding

पणजी: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश पुढील आठवड्यात बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलसोबत लग्न करणार आहे. कीर्ती बिझनेसमन बॉयफ्रेंड अँटोनीला गेल्या १५ वर्षांपासून डेट करत आहे. डेटींगनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. कीर्ती आणि अँटोनी यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

कीर्ती आणि अँटोनी १२ डिसेंबरला गोव्यात लग्न करणार आहेत. कीर्ती सुरेशने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये अँटोनी थाटीलसोबत तिच्या नातांची माहिती दिली होती.

कीर्ती आणि अँटोनीच्या व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेत दोघांच्या नावांशिवाय अभिनेत्रीच्या पालकांची नावेही लिहिली आहेत. लग्नाची तारीखही नमूद केली आहे. दोघांची लग्नपत्रिका सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

"आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या मुलीचे १२ डिसेंबर रोजी एका खासगी समारंभात लग्न होत आहे. आम्ही तुमच्या शुभेच्छा आणि शुभेच्छांचा आदर करतो. तसेच तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल अशी आशा आहे. दोघे एकत्र आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करतायेत तुम्ही त्यांना आशीर्वाद देऊ शकलात तर आम्ही तुमचे आभारी असू. रेश कुमार आणि मनेका सुरेश कुमार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि खूप प्रेम," असे या कार्डमध्ये लिहले आहे.

कीर्ती सुरेश चा होणारा पती अँटोनी थाटीलबाबत बोलायचे तर तो दुबईस्थित करोडपती उद्योगपती आहे. त्याच्याकडे रिसॉर्ट्सची चेन आहे आणि कोचीमध्ये रिटेल व्यवसाय देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT