Sara Ali Khan Viral Video  Dainik Gomantak
मनरिजवण

Sara Ali Khan Video Video: भाजप नेत्याच्या मुलासोबत 'सारा' करतेय Dating? गोव्यातला व्हिडिओ व्हायरल

Sara Ali Khan: समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि अर्जुन बाजवा एकत्र दिसत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

Sara Ali Khan Video Video

सैफ अली खानची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्काय फोर्स' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. दरम्यान, साराच्या डेटिंगच्या चर्चाही सध्या जोरात सुरू आहेत. अलिकडेच समोर आलेल्या काही व्हिडिओ आणि फोटोजमध्ये सारा भाजप नेत्याच्या मुलासोबत गोव्यात सुट्टी घालवत असल्याचे दिसून आले.

सारा अली खानचा अर्जुन प्रताप बाजवासोबतचा गोव्यातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे राजस्थानमधील फोटो व्हायरल झाले होते.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि अर्जुन बाजवा एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत सारा अली खान पांढऱ्या टी-शर्ट डेनिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तर, अर्जुन बाजवा पांढऱ्या टी-शर्ट आणि लिनन पँटमध्ये दिसत आहे.

सारा अली खान अर्जुन बाजवाच्या जवळ येते आणि त्याच्या कंबरेवर हात ठेवून काहीतरी विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका कॅफेमध्ये शूट करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि अर्जुन बाजवा यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओनंतर लोकांच्या प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत.

कोण आहे अर्जुन बाजवा?

सारा अली खानसोबत दिसलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे. अर्जुन अभिनेता आणि मॉडेल आहे. अर्जुन हा भाजप नेते फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे. फतेह जंगसिंग बाजवा हे पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते काँग्रेसचे आमदारही राहिले आहेत.

अर्जुन बाजवा देखील MMA फायटर आहे. 'सिंग इज ब्लिंग' सारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत. अर्जुनने 2019 मध्ये पंजाबच्या जिल्हा परिषदेचा सर्वात तरुण सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले. अर्जुन 'बँड ऑफ महाराजा'मध्येही दिसला होता. अर्जुनने लॉरेन्स स्कूल, सनावर येथून राजकारण आणि कृषी विषयात पदवी घेतली आहे. अर्जुनची पंजाब पोलिसात इन्स्पेक्टर (ग्रुप बी) पदासाठी निवड झाली होती, पण तो रुजू झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT