सलग दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. यंदाच्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी याचा ‘स्पेशल शो’ दाखवण्यात आला. या ‘शो’ साठी मनोज वाजपेयी यांनी केलेली ‘एन्ट्री’ सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.
‘श्रीकांत तिवारी इज कमिंग’ असे सूत्रसंचालिकेने उच्चारताच टाळ्यांचा गडगडाट सुरु झाला. मनोज वाजपेयी हे ‘श्रीकांत तिवारी’ यांच्या भूमिकेत तिसऱ्या सीझनमध्ये चमकले आहेत. त्यांच्या बहारदार अभियामुळे हा सीझनही सुपरहिट ठरेल, असा विश्वास दिग्दर्शकांना आहे.
‘द फॅमिली मॅन’ चा पहिला सीझन २०१९ मध्ये तर २०२१ मध्ये दुसरा सीझन आला होता. या वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली होती.
पहिल्या दोन सीझनमध्ये एकूण १९ एपिसोड होते आणि दोन्ही सीझनना प्रेक्षक व समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही सीझनमध्ये मनोजने छाप सोडली होती.
यंदाच्या सीझनमध्ये ‘व्हिलन’ची भूमिका साकारणाऱ्या जयदीप अहलावतने अजून उत्कंठ वाढवली आहे. तुम्ही अशा भूमिका सहज कशा काय साकारू शकतो, असे विचारल्यावर मनोज यांनी ‘केवळ मेहनत’ असे उत्तर दिले. भूमिकेला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. बाकी श्रेय लेखक आणि इतरांना जाते, असे तो म्हणाला.
या वेळीही कथा नेहमीसारखी गुप्तहेरगिरी, मिशन, पॉलिटिक्स आणि धोक्यांनी भरलेली आहे. तिसऱ्या सीझनमध्ये मुख्य पार्श्वभूमी नागालँडच्या कोहिमा या भागात सेट करण्यात आली आहे. पूर्वोत्तर भारताचे वास्तव, संस्कृती आणि वातावरण दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. फक्त ७ एपिसोडमध्ये सीझन संपवण्यात आल्याने अनेकांना हा शेवट घाईघाईत आणि प्रेक्षकांशी अन्याय केल्यासारखा वाटतो.
या सीझनमध्ये जयदीप अहलावत जेव्हा स्क्रीनवर येतो, तेव्हा संपूर्ण फोकस त्याच्याकडेच वळतो. ‘रुकमा’ हे त्याचे पात्र विशेष लक्षवेधी ठरते आणि हा सीझन त्याच्याच नावावर गेल्यासारखे वाटते. तथापि, त्याच्या कथेचा काही भाग या सीझनमध्ये पूर्ण न केल्याने दिग्दर्शकांनी थोडी अन्यायाची वागणूक दिल्यासारखे जाणवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.