IFFI 2025 Opening Dainik Gomantak
मनरिजवण

IFFI 2025 Opening: ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने उघडणार इफ्फीचा पडदा! काय असणार रूपरेषा; गोव्यातला फिल्म्स कोणत्या? पहा Video

Goa IFFI 2025: ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राजधानी पणजी सज्ज होत आहे. या महोत्सवात १२७ देशांतील ७,५०० हून अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राजधानी पणजी सज्ज होत आहे. या महोत्सवात १२७ देशांतील ७,५०० हून अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. या महोत्सवात ८४ देशांतील २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोवा मनोरंजन संस्थेत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती प्रसारण खात्याचे संयुक्त सचिव अजय नागभूषण, पत्र सूचना कार्यालयाच्या मुख्य संचालक स्मिता शर्मा, ‘एनएफडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांची उपस्थिती होती.

मुरुगन म्हणाले, की ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने इफ्फीचा पडदा उघडणार आहे. जपान हा फोकस कंट्री राहणार आहे, तर स्पेन भागीदार देश म्हणून आणि ऑस्ट्रेलिया स्पॉटलाईट देश म्हणून सामील झाला आहे.

चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि बाळकृष्णन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भारतातील पहिला एआय फिल्म फेस्टिव्हल आणि हॅकेथॉन देखील ‘इफ्फी २०२५’मध्ये आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय महिलांनी दिग्दर्शित केलेल्या ५० चित्रपटसुद्धा या महोत्सवात प्रदर्शित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

‘आंसेसांव''साठी प्रयत्न करू : मुख्यमंत्री

इफ्फीमध्ये गोव्यातील पाच चित्रपट प्रदर्शित केले जातील. यावर्षी प्राप्त झालेल्या १७ प्रवेशिकांमधून ईएसजीने त्यांची निवड केली आहे. इफ्फीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या गोव्यातील इतर २ चित्रपटांमध्ये ‘क्लावडिया’ आणि ‘पायलट’ यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑफ साउथ एशिया टोरँटोमध्ये दोन पुरस्कार जिंकलेला कोकणी चित्रपट ‘आसेसांव’च्या इंडियन पॅनोरमा विभागातील प्रदर्शनाबद्दल मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आम्ही इफ्फीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

इफ्फीची रूपरेषा

मिरामार किनारा, रवींद्र भवन-फातोर्डा आणि वागातोर किनारा पार्किंग (हेलिपॅड) येथे ओपन-एअर स्क्रिनिंग.

ईएसजी ते कला अकादमीपर्यंत मांडवी किनाऱ्यावरील पदपथावर स्टॉल आणि इतर उपक्रम.

प्रतिनिधींसाठी मोफत वाहतूक सुविधा, ज्यात रिक्षा, पूल कार, केटीसी इलेक्ट्रिक बसेस. (सकाळी ८.३० ते शेवटच्या चित्रपटाच्या शोपर्यंत)

बससेवेचे मार्ग १) मिरामार सर्कल ते आयनॉक्स पर्वरी आणि परत २) मिरामार सर्कल ते मॅजिक मुव्हिज फोंडा आणि परत. ३) मिरामार किनारा ते रवींद्र भवन, मडगाव आणि परत.

गोव्यातील निर्मात्यांचे चित्रपट

मेराकी बाय द सी (नॉन फिचर, प्रीमियर)

‘घर'' (नॉन फिचर, प्रीमियर)

गोव्यातील दिग्दर्शकांचे चित्रपट

सोहम प्रसाद भेंडे दिग्दर्शित ‘झिरो बल्ब'' (नॉन फिचर, प्रीमियर)

सोबिता कुडतरकर दिग्दर्शित ‘हळद'' (नॉन फिचर, प्रीमियर)

साईनाथ उस्कईकर दिग्दर्शित ‘माय डॅड इन्व्हेंटेड दी वडापाव : अशोक वैद्य ॲण्ड सन्स'' (नॉन फिचर, प्रीमियर)

सांस्कृतिक फ्लोट परेडने होणार महोत्सवाचे शानदार उद्‍घाटन

इफ्फीचे औपचारिक उद््घाटन भव्य फ्लोट परेडने होईल. ‘भारतीय चित्रपट, जागतिक व्यासपीठावर भारत आणि चित्रपटाचे भविष्य'' या थीमवर आधारित या परेडमध्ये दोन विभाग ठेवले आहेत. त्यात सांस्कृतिक आणि प्रचारात्मक चित्ररथ असतील. त्यात सांस्कृतिक विभागात १२ गट स्पर्धेत असतील. प्रथम बक्षीस साडेतीन लाखांचे आहे, तर उद्योगाशी संबंधित प्रमोशनल फ्लोट्स देखील असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sholay Returns In 4K: ठाकूर करणार गब्बरचा खात्मा, 'शोले'चा न पाहिलेला शेवट पाहायला मिळणार, कधी होणार रिलीज?

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Goa Today Live Updates: मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरु होणार!

'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT