shekhar kapoor 
मनरिजवण

IFFI Goa: 'मासूम' दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, इफ्फीत दिसणार नव्या भूमिकेत

International Film Festival of India 2024: दरवर्षी गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जातो.

Pramod Yadav

गोव्यात होणाऱ्या आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता शेखर कपूर यांची 'महोत्सव संचालक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

इफ्फीच्या 55 आणि 56 व्या आवृत्तीसाठी शेखर कपूर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

दरवर्षी गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जातो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 55व्या इफ्फी (IFFI) महोत्सवाचे अधिकृत पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च करण्यात आले होते.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. शेखर कपूर 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नेतृत्व करतील, असे IFFI ने सोशल मीडिया हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शेखर कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यात अनिल कपूर स्टारर 'मिस्टर इंडिया', 'बँडिट क्वीन' आणि 'एलिझाबेथ' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 'एलिझाबेथ द गोल्डन एज'च्या सिक्वेलचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

शेखर कपूर यांनी नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जुगल हंसराज आणि उर्मिला मातोडकर अभिनीत कौटुंबिक चित्रपट मासूम (1983) पासून करिअरला सुरुवात केली.

54 व्या IIFI मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ज्युरी म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच, त्यांनी 2020-2023 पर्यंत पुणेस्थित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT