Actress Varsha Usgaonker Instagram
मनरिजवण

Varsha Usgaonker: गोव्याची प्रसिद्ध अभिनेत्री गाजवतेय मराठी बिग बॉस

Bigg Boss Marathi Season 5: मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या मराठमोठ्या वर्षाताईंना चांगलीच पसंती मिळत आहे.

Pramod Yadav

Bigg Boss Marathi Season 5 Contestant Varsha Usgaonkar

मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या सर्वांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध चेहरे आणि टीव्ही व चित्रपटातील प्रसिद्ध कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे.

यात सर्वांच्या ओळखीचा आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या वर्षा उसगांवकर सर्वांना भूरळ घालतायेत. वर्षा उसगांवकरांनी ८० ते ९० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली.

मराठीतील प्रसिद्ध चेहऱ्या असणाऱ्या वर्षा उसगांवर मूळच्या गोव्याच्या रहिवासी आहेत. गोव्यातील राजकीय नेते दिवगंत अच्युत उसगांवकर यांच्या त्या कन्या होते.

वर्षाताईंच्या वडिलांनी गोव्यातील दयानंद बांदोडकर आणि शशिकला बांदोडकर यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी गोवा विधानसभेच्या सभापती पदाची देखील जबाबदारी स्वीकारली. वर्षाताईंच्या आई शास्त्रीय गायिका होत्या.

वर्षाताईंचा बिग बॉसमधील खेळ सर्वांच्याच पसंतीस पडत आहे. बिग बॉसच्या घरात दिवसभर घडणाऱ्या विविध घटनांचे शॉर्ट्स वर्षाताई त्यांच्या Instagram Profile वर शेअर करत असतात. विर्षातांईचा बिगबॉसच्या घरातील इतर सदस्यांसोबत होणार वाद किंवा इतर संवाद प्रेक्षकांना आवडत असल्याचे त्यांच्या व्हिडिओवरील प्रतिक्रियातून दिसून येते.

बिगबॉसमध्ये होणाऱ्या विविध खेळांमध्ये वर्षांताईंचा सहभाग दिसून येतो. बिग बॉसच्या घरात वयाने मोठ्या असणाऱ्या स्पर्धेक म्हणजे वर्षाताई आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती इतर सदस्यांचा आदर देखील दिसून येतो.

वर्षाताई यांच्यावर महाराष्ट्रासह गोव्यातून देखील प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पोस्टवर होणाऱ्या विविध कमेंटमध्ये त्या विजयी होतील, आशा शुभेच्छा दिल्या जातात. तर काहीजण वर्षांताईंच्या सौंदर्याचे कौतुक करतात.

हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम

खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस, लपंडाव, एक होता विदूषक, आत्मविश्वास असे मराठी तर दूध का कर्ज, दिलवाले कभीना हारे, साथी, हनीमून, तिरंगा, मंगल पांडे असे हिंदी चित्रपट केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT