Keerthy Suresh Instagram
मनरिजवण

Keerthy Suresh Wedding: ठरलं! कीर्ती सुरेश गोव्यात करणार डेस्टिनेशन वेडिंग, तारीख आली समोर

Keerthy Suresh - Antony Thattil Goa Wedding: कीर्ती - अँटनी गेल्या १५ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Pramod Yadav

Keerthy Suresh - Antony Thattil Wedding

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. कीर्ती गोव्यात लग्न करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे कीर्तीच्या लग्नाची तारीख देखील ठरली असून, तिच्या लग्नाची तयारी सध्या सुरु आहे.

दुबईचा बिझनेसमन अँटनी थट्टील याच्यासोबत कीर्ती विवाह बंधनात अडकणार आहे. कीर्ती गेल्या काही वर्षापासून अँटनीसोबत आहे. दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या यापूर्वी समोर आल्या आहेत. दरम्यान, आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात गोव्यात ते लग्न करणार आहेत.

कीर्तीचा वरुण धवनसोबत बेबी जॉन नावाची सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी कीर्ती तिरुपती बालाजी येथे आली असता तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुढील महिन्यात मी लग्न करतेय, मी तिरुपतीला देवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. गोव्यात माझे लग्न असेल, अशी माहिती खुद्द कीर्तीने माध्यमांना दिली.

कीर्ती सुरेश आणि अँटनी थट्टील ११ आणि १२ डिसेंबर रोजी गोव्यात लग्न करतील. कीर्ती - अँटनी गेल्या १५ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक वर्षांच्या या रिलेशन आता लग्नात बदलण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. (Keerthy Suresh - Antony Thattil Wedding)

कीर्ती सुरेश आणि वरुण धवन यांचा बेबी जॉन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कीर्ती आणि वरुण सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT