Utpal Parrikar Live Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Utpal Parrikar Live: माझं ठरलंय, पणजीतून अपक्ष लढणार!

मला पक्षाने जारी उमेदवारी नाकारली असली तरीदेखील मी ही निवडणूक लढवणार आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Kavya Powar

Utpal Parrikar Live: गोव्यात दिवसागणिक येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असतानाही राजकीय नेते पक्षांतर करताना दिसत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही नेते आपल्या पक्षाला सोडचिठठी देत आहेत. हे सर्व जरी असले तरी मागील काही दिवसात गोव्यातील एक मुद्दा चांगलाच चर्चेत होता. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या भाजप उमेदवारीच्या चर्चा सर्वदूर पसरल्या होत्या.

काहीही झाले तरी ही विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवणारच असा ध्यास घेतलेले उत्पल पर्रीकर यांना स्वत:च्या पक्षानेच डावलले. पणजीतून लढण्यासाठी भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आप आणि शिवसेनेतर्फे त्यांना संधी देण्याचे आश्वासन मिळाले. पण अद्याप तरी उत्पल यांनी कोणत्या पक्षासोबत निवडणूक लढवणार ही निश्चित केले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला निवडणुकीचा अजेंडा जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी आजवर पक्षाशी निष्ठेने राहिलो आहे. माझे वडील असताना त्यांनी गोव्यासाठी आणि एकंदरीत या पक्षासाठी खूप मोलाचे सहकारी केले आहे. पण आता हा पक्ष आधीसारखा राहिलेला नाही. मला पक्षाने जारी उमेदवारी नाकारली असली तरीदेखील मी ही निवडणूक लढवणार आहे. मी शेवटी ठरवले आहे की मी ही निवडणूक पणजीतून अपक्ष म्हणूनच लढणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT