Trinamool Congress
Trinamool Congress  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार आहे. त्यातच आता पहिल्यांदाच गोव्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उतरलेल्या तृणमुल काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. (Trinamool Congress has announced the second list of candidates for the Goa Assembly elections)

उमेदवारांची नावे

थिवी - कविता किरण कांदोळकर

शिवोली - लिओ डायस

कळंगुट - अँथनी मेंझेस

कुडतरी - अँथनी अल्बर्ट पिसोटो

मडगाव - महेश आमोणकर

वेळ्ळी - बेंजामिन सिल्वा

काणकोण - महादेव देसाई

या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banejree), अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee), यशवंत सिन्हा, लुईझिन फालेरो, बाबूल सुप्रियो, किरण कांदोळकर, लियांडर पेस, कीर्ती आझाद, चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. त्यातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नवीन घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचाराची रॅली आणि सभांवरील निर्बंधांत अजून वाढ केली आहे. आता हे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT