Goa TMC  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

थिवी मतदार संघात तृणमूलच्या रूपाने तिसरा पर्याय

कविता कांदोळकर : भाजप, काँग्रेसवर मतदार नाराज

दैनिक गोमन्तक

म्हापसा: लोकांचा भाजप व काँग्रेस का दोन्ही पक्षांवर लोक नाराज असून त्यांना ते पक्ष नकोच आहेत. काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास भाजपमध्ये जाईल,अशी भीती त्यांना आहे. आता थिवी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या रूपाने चांगला तिसरा पर्याय मिळाला असून, मतदार त्याबाबत खूश आहेत, असा दावा तृणमूलच्या (Goa TMC) उमेदवार कविता कांदोळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला.(Third option as TMC in Tivim constituency for goa election)

जिल्हा पंचायतीच्या सदस्य या नात्याने आपल्याला अवघ्या वर्षभराचा कालावधी मिळाला. तरीही रेवाडा, कोलवाळ, पीर्ण इत्यादी भागात आपण कित्येक विकासकामांना चालना दिली, असे नमूद करून त्या म्हणाल्या, लोकांची समस्या लक्षात घेऊन कोलवाळ येथील बंद केलेला हमरस्त्यालगतचा रस्ता खुला करण्याचे कामही मी केले. उपजिल्हाधिकारी, बांधकाम खात्याचे अभियंते इत्यादी अधिकाऱ्यांना तिथे बोलवून जनतेची गैरसोय दूर करण्यात आली. तसेच, वादळावेळी वीजयंत्रणाच कोलमडली त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत फिरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात यंत्रणांना महत्त्वपूर्ण सहाय्य केले, असेही त्या म्हणाल्या.

थिवी मतदारसंघातील (Tivim Constituency) भाजपचे नेते तानावडे, हळर्णकर, सपना मापारी इत्यादींनी सरकारी नोकऱ्या स्वत:च्या नातेवाईकांना देऊन ‘फॅमिली राज’ जोपासले आहे, तर इतर कित्येक नोकऱ्या इतरांना अक्षरश: लाखोंना विकलेल्या आहेत. तथापि तृणमूल काँग्रेस व मगो युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्व सरकारी नोकऱ्या योग्य उमेदवारांना विना मोबदला दिल्या जातील, असेही कांदोळकर म्हणाल्या.

या निवडणुकीत (Goa Assembly Election) मतदारसंघातील आठपैकी सहा पंचायत मंडळांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. वीज, रस्ता व पाणी या समस्यांची सोडवणूक मी करणारच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT