Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: निवडणूक आयोगाने केले नियमांमध्ये मोठे बदल

खुल्या मैदानात आणि बंद जागेत होणाऱ्या निवडणूक प्रचार सभांवर लादलेले नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

निवडणूक आयोगाने रविवारी रोड शो, पद यात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवरील बंदीचा कालावधी वाढवला असला तरी खुल्या मैदानात आणि बंद जागेत होणाऱ्या निवडणूक प्रचार सभांवर लादलेले नियम काही प्रमाणात शिथील केले आहेत. (Goa Assembly Election 2022)

निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतलेल्या या निर्णयाचा फायदा निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमधील राजकीय पक्षांना होणार आहे. यामुळे त्यांना मोठे प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात मदत होईल. यामध्ये गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब (Punjab) आणि मणीपुर या राज्यांचा समावेश आहे.

राज्याचे मुख्य सचिव, त्याचे निरीक्षक आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष प्रचार कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी निवडणूक आयोगाला सांगितले की, निवडणूक (Election) होणाऱ्या राज्यांमध्ये करोना संसर्गत घट झालेली दिसत आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की "खुल्या मैदानात होणाऱ्या प्रचार सभांमध्ये मैदानाच्या एकूण आसन क्षमतेच्या 30% क्षमतेचा वापर करता येईल, तसेच बंद जागेतील कार्यक्रमात पूर्ण आसन क्षमतेच्या 50% क्षमता वापरत घेता येईल.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) क्षमतेबाबत नियम बनवल्यास राजकीय पक्षांना त्याचे पालन करणे बंधनकारक असेल. "ओपन ग्राउंड रॅली" फक्त जिल्हा अधिका-यांनी मान्यता दिलेल्या आणि SDMA च्या सर्व अटींचे पालन करण्याच्या मैदानांवरच आयोजित केल्या जाऊ शकतात, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT