सुदेश मयेकर यांना प्रचारात मिळते प्रेयसी नारुषाची साथ!

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

सुदेश मयेकर यांना प्रचारात मिळते प्रेयसी नारुषाची साथ!

आपल्या प्रेयसीला घेऊन निवडणुकीत ‘खुल्लमखुल्ला’ प्रचार करणे देशाच्या उर्वरित भागात महाग पडू शकते, परंतु गोवा त्याबाबतीत पुढारलेला आहे.

Santosh Govekar

कळंगुट: सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्वभूमीवर कळंगुटमध्ये विविध पक्षांचे नेते आपापले नशीब आजमावत आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुदेश मयेकर. कळंगुट (Calangute) पंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान पंच असलेले सुदेश मयेकर आम आदमी पक्षातर्फे कळंगुटमधून निवडणूक लढणार हे निश्चित आहे. दोन महिने जोरदारपणे  चाललेल्या मयेकर यांच्या प्रचारादरम्यान सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे ती त्यांची प्रेयसी नारुषा डिसोझा.

व्यावसायिक कलाकार तसेच मॉडेल असलेल्या नारुषा हिने 2019 साली ‘मिस गोवा’ तसेच ‘रुबारू इंडिया’चा किताब पटकावलेला आहे.  सुदेश मयेकर यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या नारुषा सध्या मयेकर यांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे.

आम आदमी पक्षाची ध्येयधोरणे तसेच महिला वर्गाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच आपण मयेकर यांच्या सोबतीने पक्षाच्या विजयासाठी कार्यरत असल्याचे नारुषा हिने दै. ‘गोमन्तक’ला सांगितले. इतकेच नव्हे, तर निवडणुकीतील जय पराजय या गोष्टी बाजूला सारून मयेकर यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना शेवटपर्यंत साथ देण्यासाठी आपण बांधील असल्याचे नारुषा हिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT