Goa Assembly Election 2022 

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

लोबो यांनी यदाकदाचित भाजपपासून वेगळी चूल मांडली तर...

साळगावकर: ...तर शिलेदार म्हणून लढेन

दैनिक गोमन्तक

कळंगुट (Goa Assembly Election 2022): ‘टुगेदर फॉर बार्देश’साठी मंत्री मायकल लोबो आणि मी आजही एकत्रितच आहे. परंतु लोबो यांनी यदाकदाचित भाजपपासून वेगळी चूल मांडली तर मात्र मी भाजपचा शिलेदार म्हणून साळगाव मतदारसंघातून लढणार आहे, असे विधान माजी आमदार जयेश साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्यापासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्याला साळगाव मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) आपला विजय निश्चित असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. साळगांवकर यांचा भाजप प्रवेश झाल्यापासून स्थानिक भाजप मंडळात निर्माण झालेली बंडाळी अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रेईश-मागूशचे सरपंच केदार नाईक यांच्यानंतर आता जिल्हा पंचायत सदस्य तथा भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष रुपेश नाईक यांनीही अपक्ष म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत साळगावातून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, टुगेदर फॉर बार्देशचा एल्गार करणारे कळंगुटचे आमदार (MLA) मायकल लोबो यांनी हल्लीच केलेल्या एका वक्तव्यामुळे बार्देशातील अनेकांच्या नजरा त्यांच्या निर्णायक भूमिकेकडे लागलेल्या आहेत. तथापि, या भागातील राजकीय जाणकारांच्या मते, येत्या एक-दोन दिवसांत बार्देशातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT