Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात शिवसेना 10 ते 15 जागा लढवणार: संजय राऊत

18 जानेवारीला विधानसभेच्या जागावाटप संदर्भात होणार चर्चा

दैनिक गोमन्तक

पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि रणसंग्रामास सुरुवात झाली. गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोवा राज्यात कॅांग्रेस ने शिवसेनेसोबत आघाडी स्पष्टपणे नाकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी कॅांग्रेस गोव्यात स्वबळावर सत्ता स्थापण करू शकत नाही अशी टिका सुध्दा केली होती. दिवसेंदिवस गोव्यातील राजकारण नाट्यमय होत आहे.

रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत (National Congress Party) युती करून गोव्यात 10 ते 15 जागा लढवणार आहे. 18 जानेवारीला विधानसभेच्या जागावाटप संदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल 18 जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतील,' असे राऊत म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीलाच पवार म्हणाले होते की, गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीसाठी युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात राजकीय गणिते वेगळी असल्याचे राऊत यांनी आज सांगितले. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस (Congress)यांची युती आहे. मात्र, सध्या काँग्रेसने राज्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असे ही ते म्हणाले. भाजपचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची महाराष्ट्रात आधीपासूनच राष्ट्रवादीशी युती आहे.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी प्रचाराचा नारळ शिरोडा आणि सांतआंद्रे मतदारसंघात फोडून सुरूवात केली. अरविंद केजरीवाल यांनी डोअर-टू-डोअर प्रचार करत येथील नागरिकांची घरोघरी जाऊन भेट घेतली. या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.सध्या, गोवा राज्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. टीएमसी, आप आणि काँग्रेस यांचा विरोध करण्यासाठी टीएमसी-शिवसेना मैदानात ऊतरलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT