गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांना पवारांनी दिला सल्ला

फक्त 24 तास वाट पहा, गोव्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात निवडणुकीसाठी युती होणार की नाही हे स्पष्ट होईल

दैनिक गोमन्तक

मडगाव: फक्त 24 तास वाट पहा, गोव्यात काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी (NCP) यांच्यात निवडणुकीसाठी (Goa Election) युती होणार की नाही हे स्पष्ट होईल, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गोव्यातील (Goa) पक्षनेत्यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आज ‘गोमन्तक’ला ही माहिती दिली. डिसोझा हे आज दिल्लीला जाणार होते. मात्र आता हा निरोप मिळाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.

गोव्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार हे जवळपास नक्की झाले आहे. फक्त सोनिया गांधी यांच्याकडून त्याला हिरवा कंदील मिळण्याची वाट दोन्ही पक्षांचे नेते पाहत आहेत. काल राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांची याबाबत काँग्रेसचे दिनेश गुंडू राव यांच्याशी बोलणी झाली असून राव यांनी नंतर राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.

माझ्या काही अटी

माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य झाल्या नाहीत, तर मी माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, असे चर्चिल यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी यापूर्वी स्वतःला बाणावलीत तर आपल्या मुलीला नावेलीत उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची ही अट राष्ट्रवादीने अमान्य केली होती. पण पुन्हा त्यांनी तृणमूलशी चर्चा सुरू केली.

काँग्रेस- राष्ट्रवादी युतीला दोन्ही बाजूनी तत्त्वतः मान्यता यापूर्वीच मिळालेली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला किमान 10 जागा सोडाव्यात, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे.

- चर्चिल आलेमाव, आमदार

‘ती’ सदिच्छा भेट : चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी दोन दिवसांपूर्वी कोलकत्याला जाऊन तृणमुलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चिल तृणमुलमध्ये जाणार असे वृत्त सगळीकडे पसरले होते. मात्र, ती सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT