Savitri kavlekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

सावित्रींचा दुचाकीवरून दुर्गम भागातही प्रचार

सांगेच्या अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर जनसंपर्क वाढविताना अगदी दुर्गम भागातील घरोघरी भेट

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगेच्या अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांनी प्रचारकार्यात आपला जनसंपर्क वाढविताना अगदी दुर्गम भागातील घरोघरी भेटी देत लोकांशी संवाद साधला. प्रचार करताना ज्या ठिकाणी थेट रस्ता नाही अशा भागात दुचाकी घेऊन मतदारांच्या सावित्री कवळेकर गाठीभेटी घेत आहेत.(Goa election)

प्रचारकार्यात एकही घर सुटणार नाही याची काळजी सावित्रींकडून घेतली जात आहे. सकाळपासून रात्री दहापर्यंत सांगे(Sanguem) मतदारसंघातील डोंगर कपाऱ्यातील मतदारांच्या भेटी घेत आपले व्हिजन मतदारांना पटवून देत आसताना मतदार एक महिला उमेदवार गेल्या पाच वर्षात सांगे मतदार संघातील महिला प्रतिनिधी या नात्याने जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असल्याचे पाहून सामान्य नागरिक सावित्री संदर्भात सहानभूती व्यक्त करीत आहे.

गेल्या निवडणुकीत आपल्याला कमी वेळ मिळाला म्हणून आपण प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊ शकलो नाही म्हणून आपला पराभव झाला. ती चूक या निवडणुकीत(election) आपण करणार नसल्याने कवळेकर यांनी सांगितले.

सुवासिनींकडून आशीर्वाद

सावित्री कवळेकर(savitri kavlekar) यांनी प्रचार करताना प्रत्येक घर महत्त्वाचे असल्याचे मानत दुर्गम भागातही प्रचाराचा वेग वाढवला आहे. त्यांची धडपड व कष्ट पाहून ग्रामीण भागातील महिलाही सावित्रींचे स्वागत करीत आहेत. अनेक सुविसिनींनी सावित्री कवळेकर यांचे कुंकूमार्जन करून त्यांना आशीर्वाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT