Rane vs Rane vs Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पर्ये मतदारसंघात होणार राणेंचा तिहेरी रणसंग्राम

पणजीच्या जागेशिवाय अशीच एक जागा आहे ज्याची सध्या गोव्यात खूप चर्चा होत आहे ती म्हणजे पर्ये मतदार संघाची.

Priyanka Deshmukh

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तारखा जाहीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मतदारांना आपल्या बाजूने घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गोव्याच्या निवडणुकीत पणजी मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली आहे. त्यामागील कारण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणजीच्या जागेशिवाय अशीच एक जागा आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे ती म्हणजे पर्ये मतदारसंघाची (Poriem constituency). राणे विरुद्ध राणे विरुद्ध राणे अशी लढत या मतदारसंघात होणार आहे.

पर्ये मतदारसंघात राणेंचे तीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये पहिले नाव आहे ते विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांची सून दिव्या राणे ज्यांना भाजपने तिकीट दिले आहे. त्याचवेळी दुसरे उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांना आम आदमी पक्षाने (आप) तिकीट दिले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विश्वजित राणे या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय तिसरे उमेदवार रणजितसिंह राणे आहेत, ज्यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली आहे. रणजित राणे यांचे वडील जयसिंगराव राणे हे 1963 मध्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आमदार होते.

उमेदवारांना जागा जिंकण्याची आशा

प्रतापसिंह राणे यांनी यावेळी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले होते. जवळपास 50 वर्षे ते विधानसभेत पर्येचे प्रतिनिधित्व करत होते. अशा परिस्थितीत त्यांची सून दिव्या राणे यांच्यासाठी या मतदारसंघाचे दरवाजे उघडले आहे. दुसरीकडे 'आप'चे विश्वजित कृष्णराव राणे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, दोन विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर यावेळी त्यांना विजय मिळेल, अशी आशा आहे. आणि तिसरे म्हणजे रणजितसिंह राणे यावेळी ही जागा जिंकून आपल्या वडिलांचा वारसा दाखवतील अशी आशा आहे.

पर्ये हा राणे समाजाचा बालेकिल्ला

गोव्यातील सर्व 40 विधानसभेच्या जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून निवडणुकीचे निकाल 10 मार्चला जाहीर होतील. गोव्यात सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या स्टार प्रचारकांसह रिंगणात उतरले आहेत. पर्ये मतदार संघातही सर्व उमेदवार सतत लोकांमध्ये जाऊन आपला प्रचार करत आहे. राणे समाजातील लोकांचा फार पूर्वीपासून हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. त्यामुळेच यावेळी तीन प्रमुख पक्षांनी राणेंच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. मात्र, पर्ये मतदारसंघातून राणेंचा कोणता उमेदवाराला जनता पसंती देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

SCROLL FOR NEXT