Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: राहुल गांधी गोव्यात दाखल; घरोघरी प्रचारात सहभागी

संध्याकाळी 4:15 वाजता गांधी साखळी येथील पालिका मैदानावर आयोजित सभेला सोंबोधित करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज (शुक्रवारी) गोव्यात दाखल झाले आहेत. ते घरोघरी जाऊन लोकांना कॉंग्रेसला मत देण्याचे आवाहन करत आहेत. याचाच भाग म्हणून राहुल गांधी यांनी आज सकाळी वास्को येथील सडा येथे मुरगावचे उमेदवार संकल्प आमोणकर यांचा घरोघरी प्रचार केला. (Rahul Gandhi Goa Latest News)

पक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, राहुल गांधी 12:30 वाजता डोना पावला येथे काँग्रेस (Congress) उमेदवारांची भेट घेणार आहेत. पुढे 2:15 वाजता गांधी पर्यटन उद्योगाची निगडीत लोक, शॅक मालक आणि CII प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत. संध्याकाळी 4:15 वाजता गांधी साखळी येथील पालिका मैदानावर आयोजित सभेला सोंबोधित करणार आहेत. या सभेत राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसचा राज्यातील जाहीरनामाही प्रकाशित होईल.

दरम्यान, काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची शपथपत्रावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीनंतर ते पक्षांतर करणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या साखळी येथील सभेचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.फेसबूक (Facebook) वरूनया सभेचे आंतरराष्ट्रीय थेट प्रेक्षेपण लाखो लोकांपर्यंत जाणार असून, यावेळी काँग्रेस राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या सभेत राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसचा राज्यातील जाहीरनामाही प्रकाशित होईल.

भाजपचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या चार-पाच दिवसांपासून गोव्यात मुक्काम ठोकून आहेत. विरोधी काँग्रेसने मात्र यावेळी प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम

पुढील काही दिवस गोव्यात तळ ठोकून असतील. प्रभारी दिनेश राव, ज्येष्ठ नेत्या अलका लांबा, दिल्ली काँगेसचे उपाध्यक्ष अली मेहेंदी गोव्यातच आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींसारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गोव्यात येऊन तळ ठोकला आहे.

राहुल गांधी यांचा दौरा 2 फेब्रुवारी रोजी नियोजित होता. परंतु, संसदीय वचनबद्धतेमुळे आणि शहिदांच्या सन्मानार्थ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी 3 फेब्रुवारीला रायपूरला भेट निश्चित झाल्यानंतर गोवा दौरा 4 फेब्रुवारीला पुढे ढकलण्यात आला होता. आज अखेर गांधीचे गोव्यात आगमन झाले आहे. ते साखळी येथील सभेत काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT