Priyanka Gandhi  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रियंका गांधी आज एकदिवसीय गोवा दौऱ्यावर

प्रियांका गांधी दुपारी 12 वा. बेताळभाटी येथील गोव्याच्या माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आयरिन बार्सेस यांच्या निधनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाद्रा 7 फेब्रुवारीला एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. पणजी मतदारसंघात त्या काँग्रेसच्या घरोघरी प्रचार करण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील घटकांशी चर्चा व संवाद साधणार असल्याची माहिती गोव्याचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी दिली. (Goa Election Update)

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) दुपारी 12 वा. बेताळभाटी येथील गोव्याच्या माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आयरिन बार्सेस यांच्या निधनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील. दुपारी 12:30 ते 1:15 यादरम्यान नुवे मतदारसंघात जाहीर सभा व माजोर्डा येथे कोपरा बैठक घेतील. दुपारी 1 वा. नावेली येथे, 3 वा. सांताक्रुझ तर कुंभारजुवे येथे 3:45 वा. जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 4:30 वा. पणजीतील (Panaji) काही भागांत घरोघरी प्रचारात त्या सहभागी होतील.

राहुल गांधी 4 फेब्रुवारी रोजी गोव्या दौऱ्यावर आले होते. आगामी काही दिवसात भाजपचे दिग्गज नेते गोव्यात प्रचार करणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT