पत्रकार परिषदेत बोलताना दाबोळी काँग्रेस गटाध्यक्ष अनावलेटो डिसोझा.बाजूस इतर Dainik Gomantak
गोवा निवडणूक

दाबोळी मतदारसंघात येत्या निवडणुकीसाठी नवीन चेहऱ्याला पसंती

कॅप्टन व्हिरियतो फर्नांडिस यांनी मात्र 'गोंयचो आवाज' हा भ्रष्टाचारा विरोधात व गोव्याच्या पर्यावरणाचे (Environment of Goa) रक्षण करण्यासाठी स्थापन झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

वास्को: आवाज'चे कॅप्टन व्हिरियतो फर्नांडिस यांना असल्याचे दाबोळी काँग्रेस (Congress) गटाध्यक्ष अनावलेटो डिसोझा यांनी सांगितले. तथापि युती झाल्यास आम्ही युतीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कॅप्टन व्हिरियतो फर्नांडिस यांनी मात्र 'गोंयचो आवाज' हा भ्रष्टाचारा विरोधात व गोव्याच्या पर्यावरणाचे (Environment of Goa) रक्षण करण्यासाठी स्थापन झाल्याचे सांगितले. त्यामुळे गोंयचो आवाज सोडण्याचा प्रश्न येणार नाही. मात्र या प्रकरणी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी काँग्रेस, गोवाफॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समविचारी पक्षांची युतीसंबंधी बोलणी झाली असल्याचे सांगून आपण दाबोळीतून निवडणूक (election) लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुझे फिलिप डिसोझा यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांनी आपले लक्ष नवेवाडे, वाडे दाबोळी या भागांवर केंद्रित केले आहे. या भागांची मतदार

संख्याच सोळा ते सतरा हजार आहे. ते म्हणाले की, युतीसंबंधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या (NCP) हायकमांडने चर्चा करूननिर्णय घेतला आहे. आता फक्त जागा वाटपासंबंधी चर्चा होणार आहे. मात्र भाजप विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी युतीसंबंधी घोषणा लवकर करणे आवश्यक आहे.

अनाक्लेटो डिसोझा म्हणाले की, जुझे फिलिप मला भेटले, परंतु युतीसंबंधी प्रदेशाध्यक्ष किंवा हायकमांडकडून आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडून आदेश आल्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT