Pratap Singh Rane

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

Pratap Singh Rane: प्रतापसिंग राणे राजकीय निवृत्ती घेणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे सर्वत्र म्हंटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मागील काही महिन्यात गोव्याच्या राजकारणात कमालीचा बदल झालेला आपल्याला दिसून आला. अनेक राजकीय नेते पूर्वीचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखल झाले. यातच मध्यंतरी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) हे आमनेसामने आल्याचे वृत्त समोर आले होते. पण वडील-मुलगा आमनेसामने नसल्याचे प्रतापसिंग राणे यांनी सांगितल्यावर ह्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण आता प्रतापसिंग राणे हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे सर्वत्र म्हंटले जात आहे.

पणजीत मंगळवारी काँग्रेसच्या 137व्या स्थापनादिन कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, 'मी मागील 50 वर्षांपासून राजकारणात आहे. या दरम्यान मी आमदार, मुख्यमंत्री, सभापती अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आता माझे वय झाले आहे आणि आता नवीन रक्ताला संधी देण्याची गरज आहे. नवीन लोकानी राजकारणात येऊन काम करण्याची गरज आहे', असे मत व्यक्त करून काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी राजकारणात निवृत्त (Retirement) होण्याचे संकेत दिले आहेत.

पुढे ते म्हणाले की, 'गोव्याला प्रगतीशील राज्य बनवण्यात काँग्रेसचे (Congress) योगदान आहे. संस्कृती व धार्मिक गोष्टींचा एकोपा टिकून राहण्यासाठी कॉँग्रेसचा मोठा वाटा आहे. पक्षाला सरकार घडवण्याची उत्तम संधी असून ती दवडू नये. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आणि आता माझी निवांत आयुष्य जगण्याची वेळ आहे.

प्रतापसिंग राणे यांच्या या बोलण्यामुळे ते राजकारणातून आता निवृत होणार असल्याच्या चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात होत आहेत. त्यांचे पुढचे पाऊल नेमके काय असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT