NCP Shiv Sena Congress will not do Maha Vikas Aghadi for Goa election  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात 'महाविकास आघाडी' ला कॉंग्रेसकडून फुलस्टॉप; NCP-ShivSena एकत्र

काँग्रेसशी चर्चा करून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना-राष्ट्रवादीचा गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे 'महा विकास आघाडी' स्थापन करण्याचा प्रयत्न फेल

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार बनवणारे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (ShivSena) गोवा विधानसभा निवडणूक 2022 च्या निवडणुक रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) युती करणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काल चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनी काल जागावाटपावर चर्चा केली असून गोव्यात 10 ते 12 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आज माध्यमांशी संवाद साधतांना, "आम्ही काँग्रेसशी चर्चा केली पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे 'महा विकास आघाडी' स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेस नेत्यांनी आमच्या या प्रस्तावाला दुजोरा दिला नाही. त्यांना वाटते की ते स्वबळावर गोव्यात बहुमत मिळवू शकतात," असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र आणि गोव्यातील राजकीय गतिमानता वेगळी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची युती असताना, सध्या तरी काँग्रेसने गोव्यात कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. याआधी गुरुवारी शिवसेनेच्या नेत्याने काँग्रेसच्या एकट्या लढण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवत गोव्यातील राजकीय परिस्थिती लक्षा घेता काँग्रेसने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तर ते युनिटचा आकडाही पार करू शकणार नाही, असे वक्तव्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT