NCP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: NCP ने उमेदवारांची आणखी एक यादी केली जाहीर

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या यादीत 12 जणांना पक्षाने तिकीट दिलं आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आणखी एक यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या यादीत 12 जणांना पक्षाने तिकीट दिलं आहे. यात भाजप सोडून आजच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या फिलिप नेरी यांना वेळ्ळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. (NCP Announces List Of 12 Candidates For Goa Assembly Elections)

दरम्यान, गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तेत असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र लढत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे (Maharashtra) गोव्यातही महाविकास आघाडी करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रयत्न केले. मात्र कॉंग्रेसच्या (Congress) एक ला चलो रे च्या नाऱ्याने हा प्रयत्न विफल ठरला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जागा वाटपासंबंधी एकजूटता दाखवत विधानसभेत भाजपला (BJP) शह देण्यासाठी निकराने लढा उभा केला आहे. यातच आता राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या 12 उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे...

12 उमेदवार

  • 1 वेळ्ळी फिलिप नेरी रॉड्रिग्ज

  • 2 नुवे मिकी पाशेको

  • 3 नावेली रेहाना मुजावर

  • 4 दाबोळी - जुझे फिलिप डिसुझा

  • 5 केपे - अलोयसियस डिसिल्व्हा

  • 6 सांगे - डोमॅसिओ बरेटो

  • 7 शिरोडा - डॉ सुभाष प्रभूदेसाई

  • 8 मडकई - रवींद्र तळावलीकर

  • 9 प्रियोळ - दिग्विजय वेलिंगकर

  • 10 सांत आंद्रे - इस्टेवन डिसुझा

  • 11 पर्वरी - शंकर फडते

  • 12 थिवी - गॉडफ्री डिलाईम

शिवाय, गोव्याचे जलस्त्रोत मंत्री आणि आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज (Philip Neri Rodriguez) यांनी आपला मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा आजच सकाळी दिला होता़. वेळ्ळीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या नेरी यांनी मंत्रिपद मिळवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेरींच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा राज्यात रंगल्या होत्या. आणि आज नेरी यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाण्यात उतरताना युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे, कुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

Smart Meter Controversy: वाढीव बिले तत्‍काळ माफ करा, दंडही रद्द करून अधिसूचना जारी करा; 'आप'ची सरकारकडे मागणी

Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

खासगी क्षेत्रातील कामगारांच्‍या किमान वेतनात अनुभवानुसार वाढ! कदंबसह 'माझी बस'च्‍या तिकिटातही सूट मिळणार; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

SCROLL FOR NEXT