Nana Patole Slams CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडे अचानक एवढा पैसा कसा आला? : नाना पटोले

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट निशाणा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एक व्हॅगन आर कार होती. ते गरीब होते, मात्र सत्तेत आल्यानंतर अचानक त्यांच्याकडे एवढा पैसा कसा काय आला?, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. (Nana Patole Slams CM Pramod Sawant News Updates)

गोव्यातील खाणी (Mining) बंद झाल्या, गाड्या जागेवर उभ्या राहिल्या. त्यामुळे लोकांवर कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आली आहे. खाणबंदीतून भाजपचा खरा चेहरा समोर आला, त्यामुळे लोकांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांना घरी पाठवण्याचं ठरवलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री निवडणुकीत हरतात, याचाच अर्थ गोव्यात पर्यटन असेल किंवा कोरोनाकाळात तब्बल 850 रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडले, याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे.

भाजपने (BJP) गोव्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. कोरोनाकाळामध्ये रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात गोव्यातील भाजप सरकारला अपयश आलेलं आहे. या सरकारवर त्यावेळीच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. लोकशाहीमध्ये लोकांना कसं काय मारु शकता, अशी भावना गोमंतकीय जनतेच्या मनात आहे. आज गोवा राज्य हे बेरोजगारांचं राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. पर्यटनाचाही भाजप सरकारमुळे ऱ्हास झाला आहे, त्यामुळे जनतेला भाजप पुन्हा सत्तेत नकोय. जनता काँग्रेसला (Congress) पुन्हा निवडून देईल असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT