Michael Lobo Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Michael Lobo : गोव्यातील जनता भाजपला घरी बसवणार : लोबो

पैशाने मत विकत घेता येत नसल्याचाही टोला, काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा दावा

आदित्य जोशी

कळंगुट : गोव्यातील जनता काँग्रेसलाच स्पष्ट बहुमत देणार, असा विश्वास काँग्रेसचे कळंगुटमधील उमेदवार आणि माजी मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केला आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली. (Michael Lobo News Updates)

गोव्यातील भाजप सरकार हे जनतेचं काहीही ऐकत नाही, त्यामुळे जनता त्रस्त आहे. याचं प्रतिबिंब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) दिसणार आहे. जनता भाजपला घरी पाठवणार असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत देणार असा दावा मायकल लोबो यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षात जनतेकडे सरकारने दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्हाला 22 हून अधिक जागा मिळवून देण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. काँग्रेसला (Congress) गोव्यात स्पष्ट बहूमत मिळणार असून जनता भाजपला नाकारेल असा दावा लोबोंनी केला आहे.

भाजपकडून (BJP) पर्यावरणाची हानी झाली आहे. आम्हाला आमचं गोवा हिरवंगार हवं आहे. आम्हाला आमचे डोंगर पर्यावरण हवं आहे. त्यासाठी जनता घराबाहेर पडली आहे, असं ते म्हणाले, दरम्यान पैशांचा वापर करुन मत विकत घेतले जाऊ शकत नाही असंही लोबोंनी म्हटलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, मात्र उमेदवार लोकांच्या हिताचा विचार करणारा असावा, असंही लोबोंनी पुढे म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT