Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'ढवळीकर आधी भाजपच्या विरोधात बोलतात आणि निकालानंतर त्यांनाच पाठिंबा देतात'

असे म्हणत गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किरण कांदोळकर यांनी सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे निवडणुकीपूर्वी सातत्याने भाजप विरोधी बोलत होते. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे टाळायला हवे होते, असे म्हणत गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किरण कांदोळकर यांनी ढवळीकरांवर टीका केली.

कांदोळकर म्हणाले, ढवळीकर निकालापूर्वी भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यांचा पक्ष भाजपला (BJP) कधीही पाठिंबा देणार नाही आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मागोप कधीही काम करणार नाही, असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. ढवळीकरांची व्यक्तिरेखा सर्वांनाच ठाऊक आहे. निवडणुकीपूर्वी ते भाजपच्या विरोधात बोलतात आणि निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनाच पाठिंबा देतात. निकालापूर्वी सुदिन ज्या प्रकारे भाजपबद्दल बोलत होते, त्यांनी किमान गोव्यातील लोकांप्रती प्रामाणिकपणा दाखवायला हवा होता,” ते म्हणाले.

टीएमसीने एकही जागा जिंकली नसली तरी आम्ही गोव्याकडे (Goa) लक्ष केंद्रित करत आहोत. टीएमसीच्या भविष्यातील योजनांची आखणी करण्यासाठी 26 मार्च रोजी पणजी (Panaji) येथे विशेष बैठक होणार आहे, असे कांदोळकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT