Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कावरेपिर्लात यांचा सुभाष फळदेसाई यांना प्रतिसाद

लोकांना चांगली सेवा देण्यास आपले प्राधान्य असेल,असे फळदेसाई म्‍हणाले

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगे मतदारसंघात घरोघरी भेट दिली असता लोकांचा प्रतिसाद पाहून यावेळी सांगेतून ‘कमळ’ फुलणार असल्याची शंभर टक्के खात्री झाली आहे, असे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. कावरेपिर्ला (Kavrepirla) पंचायत क्षेत्रात आज त्यांनी आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते हजर होते.

गेल्या 22 दिवसांपासून आपण घरोघरी जाऊन प्रचार केला असून मतदारसंघातील सर्व घरांत पोचलो आहे. यावेळी लोकांचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्‍चित आहे. लोकांना चांगली सेवा देण्यास आपले प्राधान्य असेल, असे फळदेसाई (Phaldesai) म्‍हणाले.

माझा पराभव करण्यासाठी विरोधक सर्व थरातून प्रयत्न करीत आहेत. आता तर मतदारसंघात लोकांना पैशाची आमिषे दाखवून मते घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लोकांनी विरोधकांकडून दिले जाणारे पैसे घ्यावेत, परंतु त्यांना मतदान करू नये. कारण ते जो पैसा वाटत आहेत तो त्यांचा कमाईचा नसून आडमार्गाने कमावलेला आहे.त्‍यामुळे विचारपूर्वक भाजपलाच मतदान करा, असे आवाहन सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) यांनी यावेळी मतदारांना केलेआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT