BJP
BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: 'तिकीट द्या, अन्यथा अपक्ष लढू'!

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यातून यावेळेला मलाच भारतीय जनता पक्षाची उमेदवारी अपेक्षित असून प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चीज या निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा करताना जर का तिकीट नाकारले, तर अपक्ष निवडणूक लढवू असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे (BJP) फोंड्यातील (Fonda) ज्येष्ठ कार्यकर्ते तथा केंद्रीय समितीवर कार्य केलेले संदीप खांडेपारकर (Sandeep Khandeparkar) यांनी व्यक्त केले. फोंड्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत संदीप खांडेपारकर यांनी आपले मत व्यक्त करताना निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट देणे हे गैर असल्याचेही सांगितले. (Will fight as independents said BJP leader Sandeep Khandeparkar from Fonda)

गेल्या निवडणुकीत भाजपतर्फे सुनील देसाई यांना फोंड्यातून उमेदवारी दिली होती. त्यावेळेला आपण दावा केला असता तत्कालीन भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला पुढील उमेदवारी तुलाच, असे स्पष्ट सांगितले होते, आता ती वेळ आली असून यावेळेला आपल्यालाच भाजपची उमेदवारी मिळेल, असा दावाही संदीप खांडेपारकर यांनी व्यक्त केला. पुन्हा पुन्हा अन्याय सहन केला जाणार नाही, काय ते मतदारांनाच ठरवू दे, असेही खांडेपारकर यांनी सांगितले.

गेल्या 2007 च्या निवडणुकीत आपण फोंडावासीयांसमोर गेलो होतो, त्यावेळेला लोकांनी आपले स्वागतही केले होते, केवळ तिकिटाच्या अपेक्षेने नव्हे, तर पक्षहितासाठी अनेक उपक्रम राबवले. महापुरावेळी तसेच कोरोना काळात भरीव कार्य केले. सेवा केंद्रामार्फत सहायता उपक्रम सुरूच होते, त्याची व्याप्ती आता वाढवली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात आपण गरजवंतांना मदत केली आहे, पण कुठेही प्रसिद्धी घेतली नाही. आजकाल एक तांदळाची पिशवी देऊन प्रसार माध्यमांवर छान फोटो देण्याचे काहीजणांनी सत्रच सुरू केले आहे. मात्र, आपण कुठेही प्रसिद्धीची हाव न ठेवता समाजकार्य केले. कुर्टी - खांडेपार पंचायतीचा सरपंच असताना आपण आणि आपल्या पत्नीने कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे सामाजिक कार्य केले आहे, त्यामुळे आता लोकांनीच निवडणुकीत उतरवण्यासाठी पाठिंबा दिला आहे, असेही संदीप खांडेपारकर म्हणाले.

तिकिटावरून भाजपला इशारा

प्रियोळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला उमेदवारीवरून बंडाला सामोरे जावे लागले आहे. आता फोंड्यातही तीच स्थिती असून फोंडा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावरून बंडाळी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संदीप खांडेपारकर यांनी तसा इशाराच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT