Goa BJP plan to changes some leaders in Goa Assembly Election

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

गोवा भाजपमध्ये बदलाचे वारे, निवडणुकांसाठी भाजप सज्ज

2022 च्या निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या बदलांना भाजपला सामोरे जावे लागणार आहे.

Abhijeet Pote

विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी समारोप सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 19 डिसेंबर रोजी गोव्यात येत आहेत. तत्पूर्वी भाजपमध्ये 2017 पेक्षा अधिक बहुमत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत. (Goa BJP plan to changes some leaders in Goa Assembly Election)

2022 च्या निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या बदलांना भाजपला सामोरे जावे लागणार आहे. 9 मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना तिकिटे मिळणार नाहीत, 3 मतदारसंघांतील दावेदारांना बदलून नव्या उमेदवारांना तिकीट मिळणार आहे, तर 3 मतदारसंघांमध्ये बदलांची शक्यता आहे. भाजपमध्ये नव्याने आलेल्या तीन भाजप आमदारांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरविण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांमध्ये पेडण्याचे प्रवीण आर्लेकर, मयेचे प्रेमेन्द्र शेट आणि पर्वरीचे रोहन खंवटे भाजपमध्ये दाखल होत आहेत. 17 किंवा 18 डिसेंबरपूर्वी हे सर्व बदल होतील. पंतप्रधान मोदी 19 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकांच्या भाजप प्रचाराचे रणशिंग फुंकतील. ही निवडणूक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे.

या मतदारसंघात होणार बदल

पेडणे - बाबू आजगावकर, मये - प्रवीण झांट्ये, सावर्डे - दीपक पावसकर, वास्को - कार्लुस आल्मेदा, कुठ्ठाळी - एलिना साल्ढाणा, म्हापसा- जोशुआ डिसोझा, काणकोण - इजिदोर फर्नांडिस, सांताक्रुज - टोनी फर्नांडिस यांच्याऐवजी इतर उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर उतरवण्यासाठी तयारी आहे. पेडणे येथे प्रवीण आर्लेकर, मयेतून प्रेमेंद्र शेट, सावर्डे इथून गणेश गावकर, वास्कोतून दाजी साळकर, साळगाव इथून जयेश साळगावकर यांची निवड निश्चित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये चीनचा धुव्वा उडवत टीम इंडियानं रचला इतिहास; अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी

Football Match Fixing: फुटबॉल फिक्सिंगला 'रेड कार्ड'; जीएफएकडून 13 खेळाडूंसह 14 जण निलंबित, गुन्हे शाखा करणार तपास

Bus First Female Driver: 'कदंब'चे स्टेअरिंग पहिल्यांदाच महिलेच्या हाती! डिचोलीच्या पूजा वायंगणकरची 100 चालकांमधून निवड

Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

Horoscope 30 Saptember 2026: धनलाभ आणि प्रगतीचा सुवर्णकाळ! ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावाने 'या' राशी होणार मालामाल; बुधवार अत्यंत खास

SCROLL FOR NEXT