काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या श्रीमती मार्था साल्ढाणा व मारीयान रॉड्रिगीस. Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa: कुठ्ठाळी मतदार संघात गोवा प्रदेश काँग्रेसला जबरदस्त धक्का

मारीयान यांनी काँग्रेसला (congress) राजीनामा दिल्याने कुठ्ठाळीत काँग्रेस बॅकफूटवर जाणार असल्याची प्रतिक्रिया या भागातून नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: कुठ्ठाळी मतदार संघात गोवा प्रदेश काँग्रेसला (congress) जबरदस्त धक्का. कासावली पंचायतीच्या विद्यमान पंच तथा माजी सरपंच श्रीमती मार्था साल्ढाणा व सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मारिया गिल्बर्ट रॉड्रिगीस यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला रामराम केले.कार्यकत्याना विश्वासात न घेता गोवा फाॅरवर्ड पक्षाशी युती केल्याने काॅग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास भाग पाडले असल्याचे श्रीमती मार्था साल्ढाणा यांनी सांगितले.

गोवा प्रदेश (Goa region) काँग्रेस पक्षाला मुरगाव तालुक्यात गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम उलारीको रोड्रिक्स याने वास्को काँग्रेस गटाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन एका प्रकारे पक्षाविरोधात बंड पुकारले. तर बुधवार कुठाळी मतदार संघातील ज्येष्ठ काँग्रेस सदस्य तथा पाच वेळी कासावली-वेलसांव- पाली पंचायतीचे सरपंच पद भूषवणाऱ्या श्रीमती मार्था साल्ढाणा व कुठ्ठाळी मतदार संघातील सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मारियान रॉड्रिगीस यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसला कुठ्ठाळीत एल्गार पुकारला. कासावली पंचायतीच्या विद्यमान पंच सदस्य श्रीमती मार्था साल्ढाणा यांनी गेली पंचवीस वर्षे काँग्रेस पक्षाला कुठ्ठाळीत बळकट करण्यासाठी बर्‍यापैकी परिश्रम घेतले आहे. पण त्यांना काँग्रेस पक्षाने कधीच कुठ्ठाळीत काँग्रेसची उमेदवारी दिली नाही. मात्र मार्था साल्ढाणाने आपले समाज कार्य सुरूच ठेवले होते.

कुठ्ठाळीत सांकवाळचे माजी जिल्हा पंच सदस्य तथा गेल्या विधानसभा (Assembly) निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार मारीयान रॉड्रिगीस यांनी सुद्धा गोवा काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसला कुठ्ठाळीत, सांकवाळ, झुआरी नगरात अनाथ करून टाकले. मारीयान यांनी जिल्हा पंचायत सदस्य असताना अनेक विकासकामांना चालना दिली होती. यामुळे त्याचा सांकवाळ, कासावली चांगल्यापैकी दबदबा होता. मारीयान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याने कुठ्ठाळीत काँग्रेस बॅकफूटवर जाणार असल्याची प्रतिक्रिया या भागातून नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT