Campaign offices become empty Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: प्रचार कार्यालये झाली ‘सुनी-सुनी’

उमेदवार रिलॅक्स: निवडणुकीच्‍या धावपळीनंतर नेते व कार्यकर्त्यांनी घेतली विश्रांती

दैनिक गोमन्तक

डिचोली: विधानसभा निवडणूक पार पडल्याने डिचोलीत नेते आणि कार्यकर्त्यांची धावपळ एकदाची थांबली आहे. उमेदवार काहीसे ‘रिलॅक्स’ झाले आहेत. दुसऱ्याबाजूने गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आणि मतदारांनी सदैव गजबजणारी प्रचार कार्यालयेही आता ‘सुनी-सुनी’ झाली असून, ही कार्यालये बंद झाली आहेत.

आज (मंगळवारी) सकाळी फेरफटका मारला असता, डिचोलीतील बहुतेक सर्व प्रचार कार्यालये बंद असल्याचे दिसून आले. कार्यालयात लावण्यात आलेले बॅनर, झेंडेही दिसून आले नाहीत. काही कार्यालयांनी तर कालपर्यंत तरी काहीच चालू नव्हते, असे चित्र दिसून येत होते.

डिचोली शहरात भाजपसह मगो, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक प्रचार कार्यालये उघडली होती. ही प्रचार कार्यालयेही बॅनर, निशाणी आणि झेंडे लावून साजविण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रमुख उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांनी कार्यकर्ते आणि मतदारांची कायम वर्दळ दिसून येत होती. प्रत्येक कार्यालयांनी चहापानाची व्यवस्था होत होती. सारा काही गडबड, गोंधळ सुरु होता. मात्र मतदान झाले आणि हा गडबड गोंधळ एकदाचा थांबला आहे.

उमेदवारांची धावपळ थांबली

प्रचार, कोपरा बैठका, सभा यामुळे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची धावपळ आणि झोपमोड झाली होती. मतदानाच्या पूर्वरात्रीपर्यंत डिचोलीत प्रमुख उमेदवारांची झोपच गायब झाली होती. मतदानादिवशी पूर्ण दिवस मतदारसंघात फेरफटका आणि रात्री उशिरापर्यंत मतदानाच्या टक्केवारीची गणिते जुळवण्यात उमेदवार व्यस्त होते. मतदान झाल्याने उमेदवार आता काहीसे ‘रिलॅक्स’ झाले असून, त्यांचे लक्ष आता 10 मार्च रोजी व्हावयाच्या मतमोजणीकडे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT