Aleixo Reginald Lawrence  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

धरसोड वृत्ती आलेक्सवर शेकली, काँग्रेसने नाकारली उमेदवारी

कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची धरसोड वृत्ती त्यांच्यावरच शेकली असून पुन्हा काँग्रेस पक्षात येऊन कुडतरीची उमेदवारी घेण्याच्या त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची धरसोड वृत्ती त्यांच्यावरच शेकली असून पुन्हा काँग्रेस पक्षात येऊन कुडतरीची उमेदवारी घेण्याच्या त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी नाकारत माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो याना आज उमेदवारी जाहीर केली.

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर आता रेजिनाल्ड (Aleixo Reginald Lawrence) यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार अशी घोषणा केली आहे. दरम्यान रिबेलो याना काँग्रेसने उमेदवार म्हणून जाहीर केल्या नंतर कुडतरीच्या काँग्रेस करूकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. रेजिनाल्ड याना काँग्रेसची उमेदवारी मिळणे कठीण असून रिबेलो हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याचे वृत्त 'गोमंतक'ने दोन दिवसांपूर्वी आणले होते. हे वृत्त 100 टक्के खरे ठरले.

सुमारे एका महिन्यांपूर्वी रेजिनाल्ड यांनी काँग्रेस सोडून तृणमुल पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मागच्या आठवड्यात त्यांनी तृणमूल पक्षही सोडला होता. त्यांना काँग्रेस पक्षात परत आणून उमेदवारी देण्याचा प्रयत्न मायकल लोबो यांनी चालविला होता. पण उमेदवारी जाहीर केल्यानंतर रेजिनाल्ड यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. त्याचेच परिणाम त्यांना भोगावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसची उमेदवारी प्राप्त झालेले माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी आपल्यावर काँग्रेसने विश्वास दाखविल्यामुळे पक्षाच्या नेत्यांना धन्यवाद दिले असून कुडतरीत पुन्हा काँग्रेस सहज निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT