दयानंद बांदोडकर Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाऊसाहेब बांदोडकर गोमंतभूमीने पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांचे मेरुमणी

विकसित गोव्याचे स्वप्न पाहून ते साकारण्यासाठी सर्वस्व झोकून देणारा नेता स्व. दयानंद बांदोडकर होते.

दैनिक गोमन्तक

दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि उद्योगपती होते. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे गावातील एका सामान्य घरात झाला. वडिलांचे नाव बाळकृष्ण आणि आईच श्रीमंती. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे आणि माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण राजधानी पणजी येथे झाले. पोर्तुगीज आणि मराठी भाषांबरोबर फ्रेंच आणि हिंदी या भाषाचे ज्ञान त्यांना होते. दयानंद यांनी आपल्या घराण्याचा व्यवसाय वाढविला आणि पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक आणि भरपूर धन प्राप्ती मिळवली. त्यांचा विवाह सुशीलाबाई लक्षण पेडणेकर या व्यापाऱ्याच्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. त्यांना शशिकला,उषा, क्रांती आणि ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ हा मुलगा होता. पण या मुलाचे तरुणपनीच निधन झाले.

गोव्याचा राजकीय इतिहास कमीच लिहिला गेला आहे. त्यातही विशिष्ट उद्दिष्ट तथेवून लिहिलेल्या इतिहासाचे प्रमाण कमी आहे. 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी गोव्याने पंचायतीची पहिली निवडणूक अनुभवली असली तरी गोव्याचा खराखुरा राज्यकारभार चालवण्यासाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी विधानसभेची जी निवडणूक झाली ती 9 डिसेंबर 1963 रोजी. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा मोठा हात होता. त्यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात होते. त्याच सरकारने लष्करी कारवाई करून गोव्याला मुक्ती मिळवून दिली. तेव्हा गोव्यात इतर पक्ष अस्तित्वात नव्हतेच. 6 मार्च 1963 रोजी महाराष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि 13 सप्टेंबर 1963 रोजी युनायटेड गोवन या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेतृत्व भाऊसाहेब बांदोडकर करत होते. यांच्या नेतुत्वाखाली जरी निवडणूक लढवली गेली. तरी त्यांनी ही निवडणूक लढवली नव्हती. तरीसुद्धा मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनाच मिळाली. त्याच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन आणि समाजकल्याण हि खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रातमध्ये समाविष्ट करणे होते.

भाऊसाहेब मुख्यमंत्री झाल्ल्यानंतर गोवा महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे ठरविले. यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्ल्याण हे दोन महत्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्यासाठी जनमताचा कौल घेण्याचे ठरविले. कौल नि:पक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा 3 डिसेंबर 1966 रोजी राजीनामा दिला. गोव्यामध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष असल्ल्याने गोवा महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावे, म्हणून त्यांनी गावागावामधून दौरे काढले आणि प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रामध्ये विलीन करावा, या प्रश्नावर 3 जानेवारी 19 रोजी सर्वानाच मत घेण्यात आले. 1967 रोजी गोवा केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवण्यात आला. यानंतर एप्रिल 1967 च्या निवडणुकीमध्ये दादासाहेब महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून बहुमताने निवडून आले आणि गोवा राज्याचे दुसऱ्यादा मुख्यमंत्री झाले.

भाऊसाहेबानी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत गोव्यामध्ये अनके सुधारणा केल्या. गोवा राज्याचा अधिक विकास व्हावा, म्हणून त्यांनीअनेक योजना आणि कार्यक्रम राबविले. शेती आणि मासेमारीकरणाऱ्याना प्रोत्साहन दिले. गोव्यामधील उदयॊजकाना चालना दिली, ग्रामिक भागातील त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले , तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला, साहित्य आणि कलेला उत्तेजन मिळण्यासाठी राज्यात कला अकादमीची स्थापना केली. त्यांच्याअनेक क्रीडासंबंधित संस्थाना सढळ हाताने मदत केली. कोणत्याही सामाजिक कार्याला ते सढळ हाताने मदत करत. थोर दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता. क्रिकेट ,शिकार, वाचन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे पणजी येथे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT